शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

८० वर्षांच्या आजोबाचा कडाक्याच्या थंडीत जीवघेणा संघर्ष

By admin | Updated: January 16, 2017 00:38 IST

आयुष्याच्या सायंकाळी सुखाचे चार दिवस मुला-नातवंडासोबत घालवावे, अशी सर्वांचीच धडपड असते.

वन्यप्राण्यांकडून पीक उद्ध्वस्त : आयुष्याच्या सायंकाळीही शेतात जागलप्रकाश काळे गोवरीआयुष्याच्या सायंकाळी सुखाचे चार दिवस मुला-नातवंडासोबत घालवावे, अशी सर्वांचीच धडपड असते. परंतु शेतकऱ्यांच्या नशिबी कधी सुखाचे चार क्षण आलेही नाही. त्यांच्या आयुष्यात संकटाची संघर्षमय मालिकाच पुजली आहे. वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही पिकांच्या रक्षणासाठी ८० वर्षांच्या आजोबाचा जीवघेणा संघर्ष सुरूच आहे.राजुरा तालुक्यातील खामोना येथील मारोती सोमापुरके (८०) या जिगरबाज आजोबाचा संघर्ष कुटुंबीयांसाठी आधारवड ठरला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने दिवस-रात्र एक करून उभे केलेले पीक डोळ्यादेखत वन्यप्राण्यांकडून उद्धवस्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाची लढाई अशीच सुरू आहे. सध्या थंडीचे दिवस असल्याने रात्री बाहेर पडणे कठीण आहे. बोचऱ्या थंडीत रात्र कुडकुडत काढणे व जीव धोक्यात घालून पिकांचे रक्षण करणे ही ८० वर्षाचा आजोबाला आयुष्याच्या सायंकाळीही धडपड करावी लागत आहे. पिकांचे रक्षण करताना वन्यप्राण्यांकडून स्वत:चा बचाव करता यावा आणि जंगली जनावर दुरूनच दिसावे, यासाठी त्यांनी शेतात मचाण उभारली आहे. सध्या शेतात कापूस, तूर, गहू, हरभरा ही पिके डौलाने उभी आहेत. मात्र, एका रात्रीतून या पिकांची वन्यप्राण्यांकडून वाट लावण्यात येत आहे. शेतकरी नेहमीच अस्मानी, सुलतानी संकटात भरडला जात आहे. वन्यप्राणी पीक उद्धवस्त करीत असल्याने शेतकरी पुरता काकुळतीला आला आहे. त्यामुळे ८० वर्षांच्या या आजोबांनी पिकांच्या रक्षणासाठी शेतातच डेरा टाकला आहे. ‘जिना यहाँ, मरना यहाँ’, यासारखी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे. वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या जिवाला धोका आहे. कधी हिंस्रपशू येऊन शेतकऱ्याचा घास घेईल, हे सांगणेही कठीण आहे. परंतु, हाताय पीक आले नाही, तर कर्जाचा डोंगर पुन्हा वाढेल, या विचाराने जीव धोक्यात घालून पिकांचे रक्षण करणे सुरू आहे.शेतकऱ्यांचा जीवनमरणाचा संघर्ष कायमवन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. परंतु त्याकडे कोणी कधी लक्षही दिले नाही. त्यामुळे पिकांच्या रक्षणासाठी जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना पिकांची ‘राखण’ करावी लागत आहे. हा कधीही न संपणारा जीवन मरणाचा संघर्ष आजही कायम आहे.हातात आलेले वन्यप्राणी पीक उद्ध्वस्त करीत आहेत. वन्यप्राणी दिवस-रात्र शेतात धुमाकूळ घालत असल्याने उत्पन्न मिळणार नाही. म्हणून वन्यप्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतात जागलं करावे लागत आहे.- मारोती सोमापुरके, शेतकरी, खामोना.