शहरं
Join us  
Trending Stories
1
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
2
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
3
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
4
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
5
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
6
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
7
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
8
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
9
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
10
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
11
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
12
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
13
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
14
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
15
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
16
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
17
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
18
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
19
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
20
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)

बैलबंडीनंतर आता फायबर कॅरेट

By admin | Updated: April 2, 2016 00:45 IST

जिल्हा परिषदेत सध्या बैलबंडीचा विषय गाजत असताना आधी मंजुरी नंतर नामंजूर या वादात फायबर कॅरेटही अडकले आहे.

जिल्हा परिषद : पुरवठादाराला आधी मंजुरी, नंतर नामंजूर चंद्रपूर : जिल्हा परिषदेत सध्या बैलबंडीचा विषय गाजत असताना आधी मंजुरी नंतर नामंजूर या वादात फायबर कॅरेटही अडकले आहे. काही दिवसांत स्थायी समितीची सभा होणार असून या सभेत फायबर कॅरेटचा मुद्दा वादळी ठरण्याची शक्यता आतापासूनच निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना कॅरेट वितरीत केले जाते. १० टक्के लाभार्थी आणि ९० टक्के शासन या तत्त्वावर कॅरेटचे शेतकऱ्यांना वितरण केले जाते. मागील अंदाजपत्रकात कॅरेटसाठी तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार शेतकऱ्यांना कॅरेट दिले जाणार होते. ३० लाखांवरील खरेदीचे निर्णय स्थायी समिती घेते. त्यामुळे स्थायी समितीच्या सभेत हा विषय होता. ई-टेंडरिंगमध्ये वर्धमान इंडस्ट्रीजचे दर कमी असल्याने त्यांना कॅरेटचे कंत्राट मिळणार होते. मात्र मागील वर्षी वर्धमान इंडस्ट्रीजने शिलाई मशीनचा पुरवठा योग्यरित्या केला नाही. तो तो आधी करावा, नंतरच कॅरेटला मंजुरी देऊ, अशी भूमिका स्थायी समितीतील काही सदस्यांनी घेतली. वास्तविक प्रोसोडिंग झाल्यावर मालाचा पुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा हिताचा विचार करता प्रोसोडिंग न करताच कॅरेट वितरीत करण्याचे आदेश पुरवठादाराला दिले. मार्च एन्डींग तोंडावर असल्याने पुरवठादारानेही कॅरेटचे वितरण केले. मात्र प्रोसोडिंग न करता कॅरेटचे वितरण करण्यात आल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांनी हा विषय नामंजूर केला.त्यामुळे नाराज होवून उपाध्यक्ष कल्पना बोरकर यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. कृषी विभागाला टार्गेट केले जात असल्याचे सांगून त्यांनी थेट अध्यक्षांवर नाराजी व्यक्त केली होती. कॅरेटमुळे सत्ताधाऱ्यांत सुरु झालेल्या वादात विरोधकांनीही उडी घेतली आहे. कॅरेटचा मुद्दा तापविणे सुरु केले असून प्रासोडिंग न करताच मालाचा पुरवठा करणे म्हणजे काम नियमबाह्य असल्याचा ठपका विरोधकांनी ठेवला आहे. सभागृहात नामंजूर झालेला विषय मंजूर कसा काय झाला, त्यामगे कोणती गणिते आहेत, याची चौकशी करण्याची मागणीही आता होत आहे. या साऱ्या प्रकारामुळे अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार असल्याची चिन्हे आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)