शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांच्या स्वबळाचा पोलिसांना ताप

By admin | Updated: September 29, 2014 23:01 IST

भाजप-शिवसेनेची २५ वर्षाची जुनी युती तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षाची आघाडी आता तुटली आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला

बंदोबस्ताचे नियोजन कोलमडले : प्रचार रॅली, जाहीर सभा, मिरवणुकांत होणार दमछाकचंद्रपूर : भाजप-शिवसेनेची २५ वर्षाची जुनी युती तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षाची आघाडी आता तुटली आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असला तरी, पोलिसांचा ताप मात्र वाढला आहे. कारण निवडणूक बंदोबस्ताचे नियोजनच कोलमडले आहे. यापूर्वी भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असल्यामुळे एका मतदार संघात युती व आघाडीचे दोनच उमेदवार रिंगणात असायचे. मात्र आता युती व आघाडी तुटल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना या प्रमुख पक्षाचे स्वतंत्र्य उमेदवार रिंगणात राहणार आहेत. तर युती-आघाडी तुटल्याने अनेकांना तिकीट मिळाली नाही. चारही प्रमुख पक्षात बंडखोरी झाली. काहींनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे यावर्षीच्या विधानसभा निवडणूकीत एका क्षेत्रात उमेदवार वाढले आहेत. ज्या मतदार संघात दोन ते तीन उमेदवार मुख्य असायचे तेथे आता चार ते पाच उमेदवार प्रमुख असणार आहेत. त्यामुळे जाहिर सभा व प्रचार रॅलींची संख्याही वाढणार आहेत. या सभा व रॅलींना बंदोबस्त पुरविताना पोलिसांच्या नाकीनऊ येणार आहे. सर्वत्र दुर्गोत्सवाची धूम सुरु आहे. ठिकठिकाणी रोषणाई करुन दांडीया, गरबा असे कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे या सार्वजनिक कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी काही दिवसांची वेळ असली तरी दुर्गोत्सव होताच पोलीस कर्मचारी निवडणूक बंदोबस्ताच्या तयारीला लागणार आहे. ईव्हीएम मशीन पोहचविणे व मतदान केंद्रावर सुरक्षा करावी लागणार आहे. मात्र, प्रचाराला सुरुवात झाली असून दोन ते तीन दिवसानंतर प्रमुख पक्षाचे उमेदवार आपआपल्या क्षेत्रात जाहिर सभा घेणार आहेत. तर काही पक्ष सिनेअभिनेत्यांना आणून प्रचार रॅली काढतील, अशावेळी पोलिसांना बंदोबस्त पुरवावे लागणार आहे. प्रचारासाठी उमेदवारांना १२ दिवसांचा अवधी मिळणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षामध्ये स्टार प्रचारकाच्या सभा होणार आहे. मात्र तालुकास्तरावर उपलब्ध असलेली मैदान, शाळा, महाविद्यालयाच्या पटांगणावर जाहिर सभा होणार असल्याने या मैदानावर सभा घेण्यासाठी परवानगी देतानाही पोलिसांना अडचणी येणार आहेत. दुर्गोत्सव व निवडणूक अशा दोन बंदोबस्तात उमेदवारांची वाढलेली संख्या ही पोलिसांना तापदायक ठरत असून मनुष्यबळ पुरविताना नाकीनऊ येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)