शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मालडोंगरीवर तयार होणार फळरोपवाटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:31 IST

ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून दरवर्षी फळांच्या रोपांची दरवर्षी वाढत असल्याने मालडोंगरी येथील बीज गुणन प्रक्षेत्राचे फळरोपवाटिकेत विस्तारीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याकरिता ९५ लाखांचा निधी मंजूर केला असून लवकरच पायाभूत कामांना सुरूवात होणार आहे.

ठळक मुद्दे९५ लाख मंजूर : बीज गुणन प्रक्षेत्राचे विस्तारीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून दरवर्षी फळांच्या रोपांची दरवर्षी वाढत असल्याने मालडोंगरी येथील बीज गुणन प्रक्षेत्राचे फळरोपवाटिकेत विस्तारीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याकरिता ९५ लाखांचा निधी मंजूर केला असून लवकरच पायाभूत कामांना सुरूवात होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील फळबाग लागवडीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणार आहे.मालडोंगरी येथे सन १९६१ रोजी बीज गुणन प्रक्षेत्र स्थापन करण्यात आले. या प्रक्षेत्रात २० हेक्टर ४० आर जमीन आहे. यापैकी गोसेखुर्द प्रकल्पाखालील क्षेत्र ४ हेक्टर ३० आर आणि बांधकामाखाली ०.३० आर जमीन राखीव ठेवण्यात आली. उर्वरीत १५ हेक्टर ८० आर क्षेत्रावर रोपवाटिका तयार करण्यासाठी अनुकूलता आहे. सदर प्रेक्षत्रावर बारमाही सिंचनाची सुविधा असल्याने रोपवाटिका स्थापन करण्याला वाव आहे. हे प्रक्षेत्र नागभीड उपविभागात येते. मागील काही वर्षांपासून ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी आंबा. कागदी लिंबू, पेरु, जांभुळ, आवळा, डाळींब आदी प्रमुख पिकांच्या रोपांची मागणी करीत आहेत. शिवाय महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत फळबाग लागवडीकरिता कलमा रोपांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता निर्माण झाली. परंतु जिल्ह्यातील अन्य क्षेत्रात अशी भौगोलिक परिस्थिती नसल्याने रोपे मिळविण्यासाठी प्रशासनाला अन्य राज्यातील जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. सद्यस्थितीत मालडोंगरी येथील बीज गुणन प्रक्षेत्रावर आंब्याचे २४ मातृवृक्ष आहेत. या ठिकाणी कागदी लिंबू, पेरु, जांभुळ, आवळा, डाळींब आदी मातृवृक्षांची लागवड केल्यास शेतकऱ्यांनाही याचा लाभ होऊ शकतो. याच हेतूने मालडोंगरी येथील प्रक्षेत्राचे फळरोपवाटिकेत विस्तारीत करण्यात येणार आहे. रोपवाटिका निर्माण केल्यास वेगळी कर्मचारी पदे आणि प्रक्षेत्रावरील कोणत्याही घटकावर परिणाम होणार नाही. वित्तीय भार पडणार नाही. या प्रक्षेत्रावर रोपवाटिका तयार झाल्यानंतर परिसरातील शेतकºयांना कलमा रोपांची उपलब्धता होऊन फळबाग लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.शेतकऱ्यांना चालनाशेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी ही रोपवाटिका उपयुक्त ठरणार आहे. प्रक्षेत्रातील कलमे रोपे विक्रीपासून आर्थिक फायदा होईल. मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. एकूण उपलब्ध क्षेत्रापैकी १५.८० हे. क्षेत्रावर तालुका फळरोपवाटिका स्थापन करण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने राज्य शासनाकडे पाठविला होता. राज्य शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत उच्च तंत्रज्ञानावर आधारीत फळरोपवाटिका स्थापन करण्यास मंजुरी प्रदान केली. प्रकल्पासाठी ९६ लाखांचा निधी तातडीने देण्याचा आदेश कृषी विभागाचे सहसचिव अशोक आत्राम जारी केला आहे.