शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

स्त्री भ्रूणहत्या हा सामाजिक कलंकच

By admin | Updated: January 19, 2016 00:44 IST

स्त्री शक्तीची उज्ज्वल परंपरा या महाराष्ट्राला लाभली आहे. अनेक थोर स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वातून या राष्ट्राच्या उभारणीत योगदान दिले आहे.

अर्चना डेहनकर : स्त्रीशक्तीच्या जागराने युवती संमेलनाचे सूप वाजलेचंद्रपूर : स्त्री शक्तीची उज्ज्वल परंपरा या महाराष्ट्राला लाभली आहे. अनेक थोर स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वातून या राष्ट्राच्या उभारणीत योगदान दिले आहे. आज स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात मागे राहिली नसताना व तिचे पत्नी, भगिनी व माता हे अस्तित्व अनंत काळापासून टिकून असताना स्त्रीभ्रूण हत्येसारखा प्रकार या देशात घडतो, ही शोकांतिकाच नसून सामाजिक अभिशाप आहे, असे प्रतिपादन नागपूरच्या अर्चना डेहनकर यांनी केले.भारतीय जनता युवा मोर्चा व भाजपा महिला आघाडी चंद्रपूर महानगरच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक आयएमए हॉल गंजवार्ड येथे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ युवती महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या संमेलनाचा सोमवारी समारोप झाला. यावेळी त्या बोलत होत्या.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आ. नाना शामकुळे होते. या कार्यक्रमाला चंद्रपूर महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष विजय राऊत, महापौर राखी कंचर्लावार, प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा वनिता कानडे, प्रदेश युवा मोर्चाच्या सरचिटणीस अर्चना डेहनकर, भाजपाचे जिल्हा महासचिव संजय गजपुरे, जिल्हा महिला आघाडीच्या सरचिटणीस अंजली घोटेकर, सुभाष कासनगोट्टूवार, डॉ.मंगेश गुलवाडे, मोहन चौधरी, आशा आबोजवार, नगरसेविका ललिता गराट, माया उईके, रत्नमाला वायकर, सुषमा नागोसे, शिला चव्हाण आदींची उपस्थिती होती.प्रास्ताविक या महासंमेलनाच्या जिल्हा संयोजिका स्मिता नंदनवार यांनी केले. या युवती महासंमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित वक्तृत्व, रांगोळी व चित्रकला स्पर्धेत अनेक शाळांमधील युवतींनी सहभाग घेतला. विजयी स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले. आभार वनश्री मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वर्षा कोठेकर, राहुल लांजेवार, रोशण ढवळे, प्रणीती चौधरी यांची सहकार्य लाभले. संमेलनाचा बहुसंख्य युवतींनी लाभ घेतला. (शहर प्रतिनिधी)