शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:50 IST

माना समाजाला न्यायालयाने आरक्षण दिले असून धनगर समाजालासुद्धा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत आहेत. गडचिरोली भाजप जिल्हा अध्यक्ष असताना मी आमदार कृष्णा गजभे व नुकतेच आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे यांना एबी फार्म देऊन निवडून आणले.

ठळक मुद्देअशोक नेते : राजकीय विरोधकांचा बदनाम करण्याचा डाव

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : माना समाजाला न्यायालयाने आरक्षण दिले असून धनगर समाजालासुद्धा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत आहेत. गडचिरोली भाजप जिल्हा अध्यक्ष असताना मी आमदार कृष्णा गजभे व नुकतेच आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे यांना एबी फार्म देऊन निवडून आणले. तसेच इतर विषयावरसुद्धा सरकार माना व धनगर समाजाच्या पाठीशी आहे. काही दिवसांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन राजकीय विरोधकांनी मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. आपण माना समाज व धनगर समाज विरोधात नसल्याचे सांगत षडयंत्र रचणाºयांनी ठोस पुरावे द्यावे. माना व धनगर समाजाच्या नेत्यांना आवाहन करतो की कोणाच्या भूलथापांना बळी पडू नये. खोटी माहिती प्रसार माध्यमातून देणाºया त्या तथाकथित व्यक्ती विरुद्ध मानहानीचा दावा करून फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे खासदार अशोक नेते यांनी चिमूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.चिमूर-गडचिरोली क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्यावर केलेल्या आरोपाचे खंडन करण्यासाठी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेला स्वत: आ. किर्तीकुमार भांगडिया, वसंत वारजूकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ श्याम हटवादे, तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, उपस्थित होते.खासदार अशोक नेते म्हणाले, २१ जानेवारीला गडबोरी येथील कार्यक्रमात आदिवासी नेत्यांनी प्रास्तविकातून प्रश्न विचारला की माना व धनगर समाज आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करीत आहे. यावर आळा बसला पाहिजे. यावर बोलताना मी त्यांना सांगितले की माना समाजाचा विषय कोर्टात आहे. तर त्यांना कोर्टाने अधिकार दिले. त्यामुळे मी यावर काही करू शकत नाही. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठीचा विषय शासन दरबारी आहे व यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. त्यामुळे मी यावर काही बोलू शकत नाही, असे मी बोललो होतो. मात्र विरोधकांनी काही लोकांना हाताशी धरून मी जे बोललो नाही ते बदलवून समाज माध्यमातून खोटी माहिती पसरवली. हे मला बदनाम करण्याचे विरोधकांनी रचलेले हे षड्यंत्र आहे, खा. नेते यांनी यावेळी स्पष्ट केले.नेते यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सिंदेवाहीत मोर्चासिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी या गावात आदिवासी समाजाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी उद्घाटनप्रसंगी माना समाजाबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. याचा व्हिडीओ व्हॉटसअ‍ॅपवर वायरल झाला. याच्या निषेधार्थ तालुक्यातील माना समाजाने तहसील कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो महिला, पुरूष सहभागी झाले होते. सदर मोर्चा शिवाजी चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हरी बारेकर, ग्रामपंचायत सदस्य रवी सावकुडे, अमोल नागोसे, स्वप्नील श्रीरामे सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयावर विसर्जित करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी खा. अशोक नेते यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.