शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कच्च्या मालाअभावी बल्लारपूर पेपर मिल बंद पडण्याची भीती

By admin | Updated: May 2, 2016 00:44 IST

सन १९५२ पासून सुरू झालेले बल्लारपूर पेपर मिल हे उद्योग, तेथे कागद निर्मितीकरिता लागणाऱ्या बांबूच्या कच्चा मालाच्या अभावी बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

नरेश पुगलिया यांचा आरोप : सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मजदूर सभेच्या साखळी उपोषणाला प्रारंभबल्लारपूर : सन १९५२ पासून सुरू झालेले बल्लारपूर पेपर मिल हे उद्योग, तेथे कागद निर्मितीकरिता लागणाऱ्या बांबूच्या कच्चा मालाच्या अभावी बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शासनाच्या वनविभागाने पेपर मिलला कच्चा माल मिळवून देऊन उद्योग बंद होण्याचे संकट टाळावे, या मागणीकरिता या पेपर मिल मधील मान्यताप्राप्त कामगार संघटना बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभा आणि विदर्भ किसान काँग्रेस यांनी आज रविवार १ मपासून येथील नगर परिषद चौकात साखळी उपोषण आरंभिले आहे. या कामगार संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया हे आहेत. त्यांच्याच उपस्थितीत रविवारी ११ वाजता उपोषणावर वसंत मांढरे, रामदास वागदरकर, वीरेंद्र आर्य, टी सत्यनारायण हे कामगार प्रतिनिधी तर जिल्हा परिषद सदस्य तथा विदर्भ किसान काँग्रेसचे रामभाऊ टोंगे हे बसले आहेत.या उपोषणाबाबत यांनी नरेश पुगलिया यांनी सांगितले, पेपर मिलला आजवर शासन नियमाप्रमाणे वनविभागाकडून आवश्यक तेवढा बांबू मिळत आला आहे. चार वर्षापूर्वीपर्यंत सारे सुरळीत होते. नेहमीप्रमाणे २०१५-१६ या वर्षाच्या बांबू मागणीकरिता शासनाने निविदा मागविल्या. पण, फक्त एकाच पार्टीकडून फार्म आला. या सबबीखाली यावर वनविभागाने कोणताच निर्णय घेतला नाही. तो अडवून ठेवला आहे. वनविभागाकडून पेपर मिलला मागील ५० वर्षांपासून दरवर्षी दीड लाख टन बांबू मिळत आलेला आहे. परंतु, वनविभाग आणि शासन यांच्या नवीन प्रणाली व अडेलतट्टू धोरणामुळे दोन वर्षांपासून या मोठ्या उद्योगाला बांबू मिळणे कठीण झाले आहे. परिणामी उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार हेच वनमंत्री आहेत. खरे तर त्यांनी आपल्या जिल्ह्यातील उद्योग म्हणून त्यांनी याकडे जिव्हाळ्याने बघायला हवे. मात्र, तेच याकडे जाणून दुर्लक्ष करीत आहेत. या उद्योगावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष १० हजार कुटुंब अवलंबून आहेत, याचा विचार त्यांनी करायला हवा, असा आरोप करीत त्यांचे या समस्येकडे लक्ष वेधले. कच्चा माल न मिळाल्यास उद्योग बंद होण्याची पाळी येऊ शकते. यास्तव शासनाने गंभीर दखल घेऊन कच्चा माल ‘बांबू’ मिळण्याचा मार्ग मोकळा करावा. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र करावे लागेल, असा इशारा शासनाला दिला. या उपोषणादरम्यान वनविभागाकडून सकारात्मक हालचाली न झाल्यास २ हजार कामगारांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटू आणि वेळ पडल्यास न्यायालयाचे दार ठोठावू असा निर्धार पुगलिया यांनी व्यक्त केला. या पत्रपरिषदेत घनश्याम मुलचंदानी, नगराध्यक्षा छाया मडावी, टी. पदमाराव, नासीरखान, दिलीप माकोडे, रणजीतसिंग अरोरा, देवेंद्र आर्य, अविनाश ठावरी, माजी नगराध्यक्षा रजनी मुलचंदानी, अ‍ॅड. हरीश गेडाम आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)कच्चा माल ही समस्या मुख्य व्यवस्थापनाची आहे. ते आपल्या या साखळी उपोषण व मागणीच्या पाठीशी आहे काय, या प्रश्नावर पुगलिया म्हणाले, व्यवस्थापन गप्प बसले आहे. याचेच आश्चर्य वाटते. ते हा उद्योग बाहेरही हलवू शकतात. तशी पाळी येऊ नये याकरिताच आमचा कच्चा माल बांबू मिळावा याकरिता हा संघर्ष आहे. पुगलिया म्हणाले, पेसा हा कायदा अस्तित्वात आला व या उद्योगाला मिळणारा बांबु मिळण्याला अडचणी येऊ लागल्या. केंद्र व राज्य सरकार मेक इन इंडियाची बढाई मारत आहे. तर दुसरीकडे देशातील व राज्यातील चालू उद्योग बंद होत आहे. उद्योगांना कच्चा माल पुरविण्याची जबाबदारी शासनाची आहे. पण, तेच त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असल्याचा आरोपही माजी खासदार नरेश पुगलिया यांनी या पत्रकार परिषदेत केला.