शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना वेठीस धरून एफडीसीएमची भरती

By admin | Updated: August 27, 2014 23:23 IST

चंद्रपूर जिल्ह्यात वनविकास महामंडळाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र या प्रक्रियेसाठी नागरिकांना वेठीस धरले जात आहे. बाबुपेठ ते जुनोना मार्ग यासाठी बंद करण्यात आला आहे.

जुनोना रस्ता बंद : वाहनधारकांची डोकेदुखी वाढलीचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वनविकास महामंडळाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र या प्रक्रियेसाठी नागरिकांना वेठीस धरले जात आहे. बाबुपेठ ते जुनोना मार्ग यासाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पोंभूर्णा तालुक्यात जाणाऱ्या नागरिकांना आपली वाहने नाईलाजाने मूल किंवा बल्लारपूर मार्गाने न्यावी लागत आहे. यात त्यांना सुमारे २५ ते ३० किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.वनविकास महामंडळ चंद्रपूर जिल्ह्यात भरती प्रक्रिया राबवित आहे. वनपाल, वनरक्षक, चालक, चौकीदार अशी पदे भरली जात आहे. यासाठी शेकडो तरुणांनी आपले नामांकन दाखल केले आहे. या तरुणांची धावण्याची व इतर चाचणी घेण्यासाठी बाबुपेठ ते जुनोना या जागेची वनविकास महामंडळाने निवड केली. मात्र ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येते आणि हा मार्ग चंद्रपूरला पोंभूर्णा तालुक्याला जोडणारा जवळचा मार्ग असल्याने येथून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. विशेष म्हणजे, मागील तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. सकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत या मार्गावर भरती प्रक्रिया राहत असलीतरी दुपारी ३ वाजेपर्यंतही हा मार्ग नागरिकांसाठी मोकळा नसतो. पोंभूर्णा तालुक्यातील अनेक कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी चंद्रपूरला येतात व चंद्रपूरवरून पोंभूर्णाला जातात. त्यांच्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. मात्र वाहतुकीसाठी हा मार्ग बंद केल्याने नागरिकांना मूल-जानाळा- सुशी मार्गे व बल्लारपूर-येनबोडी-गिलबिली मार्गे पोंभूर्ण्याला जावे लागत आहे. यात त्यांना नाहक २५ ते ३० किलोमीटरचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)