शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मराठी शाळेचा विद्यार्थी बनला फौजदार

By admin | Updated: June 17, 2016 00:55 IST

अधिकारी बनण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणे गरजेचे आहे, या समजुतीतून अनेक पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत दाखल करतात.

पहिल्याच प्रयत्नात मिळविले यश : वर्धा येथे पीएसआय म्हणून रूजूराजकुमार चुनारकर खडसंगीअधिकारी बनण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणे गरजेचे आहे, या समजुतीतून अनेक पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत दाखल करतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या एकदम घसरली आहे. त्यामुळे अनेक मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. याला प्रकाराला चपराक देत जिल्हा परिषदेच्या खडसंगी येथील मराठी माध्यमाचे शिक्षण घेवून पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण करून अमोल सुधाकर कोल्हे याने मराठी शाळेतील विद्यार्थ्यापढे एक आदर्श निर्माण केला आहे. मराठी शाळेत शिकुनही मोठ्या पदावर जाता येते, हे त्याने सिद्ध करून दाखविले आहे.मुळचे ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील असलेले सुधाकर कोल्हे खडसंगी येथे आपल्या मामाजीच्या साह्याने खडसंगी येथे आलेत. वनविभागात काही दिवस काम करीत खडसंगीलाच त्यांनी आपली कर्मभूमी केली. खडसंगी मध्येच सुधाकर यांचा संसार वेलीवर आला. त्यांना दोन मुले व दोन मुली जन्माला आल्या. वनविभागात तुटपुंज्या मजुरीवर काम करून आपल्या परिवाराचे पालण पोषण करण्यास सुधाकर कोल्हे यांना मोठी कसरत करावी लागत होती. सर्वसामान्य परिस्थिती असल्याने चारही मुलाचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच केले. त्यापैकी त्यांची मोठी मुलगी ही एम.ए. बी.एड. झाली. त्यामुळे सुधाकर कोल्हे यांच्या परिवारात शिक्षणाचे वातावरण असल्याने सर्वच मुलं शिक्षणात हुशार होते. मात्र परिस्थितीमुळे त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकविता आले नसल्याचे शल्य सुधाकर कोल्हे यांना होते. मात्र अमोलच्या या यशाने ते काही प्रमाणात समाधानी असल्याने त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होते.अमोलने चवथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडसंगी येथे पूर्ण केले. तर अकरावीपासून आनंदवन वरोरा येथे नंतर शिक्षक बनण्याच्या दृष्टीने डी.एड. केले. मात्र डोनेशनसाठी पैसे नसल्याने शिक्षक बनण्याचे स्वप्न दूर ठेवत आता आपण एक चांगला अधिकारी बनावा, असा निश्चित करत अमोलने पुणे येथे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. अखेर अमोलला पहिल्याच प्रयत्नात यश आले. पी.एस.आय. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अमोल प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकादमीत दाखल झाला. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नुकतेच ११३ व्या तुकडीची आटपरेड मुख्यमंत्री फडणवीस याच्या उपस्थितीत पार पडली. प्रशिक्षण यशस्वी करीत अमोलची पहिली नियुक्ती वर्धा येथे करण्यात आली.आपल्या मुलाला खाकी वर्दीतील अधिकाऱ्याच्या वेशात बघुन अमोलच्या परिवारामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मनामध्ये जिद्द असल्याने वडील वनमजूर म्हणून वनविभागात तुटपुंज्या वेतनावर नोकरी करीत परिवाराचा गाढा चालवित होते. अमोलला पाहिजे तेवढे शैक्षणिक चांगले वातावरण नव्हते तरी मिळेल त्या साधनांच्या आधारे अमोलने खडसंगी सारख्या गावात यश मिळविल्याने खडसंगीचे नावही रोषण केले आहे. मराठी शाळेचा विद्यार्थीही ‘फौजदार’ बनू शकतो हे अमोल कोल्हे यांनी दाखवून देत येणाऱ्या पिढ्यासमोर आदर्श निर्माण केला आहे.