शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘बदली हवी टीम’चे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:13 IST

राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या परिपत्रकान्वये शिक्षक संवर्गाची बदली प्रक्रिया प्रशासनाने तत्काळ राबवावी, या मागणीसाठी ‘बदली हवी टीम’ तर्फे बुधवारी जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या परिपत्रकान्वये शिक्षक संवर्गाची बदली प्रक्रिया प्रशासनाने तत्काळ राबवावी, या मागणीसाठी ‘बदली हवी टीम’ तर्फे बुधवारी जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात बदलीपात्र जवळपास २०० शिक्षक सहभागी झाले होते.राज्य शासनाने काढलेल्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार शिक्षक संवर्गाच्या बदली प्रक्रियेची सुरूवात मे २०१७ पासून करण्यात आली. परंतु शासन निर्णयाविरोधात काही शिक्षक न्यायालयात गेले. परंतु त्याच निर्णयानुसारच बदल्या करण्यास परवानगी दिली आहे. दिवाळी सुटयानंतर बदली प्रक्रिया राबविणे आवश्यक असताना प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रक्रिया पूर्ण केली नाही.या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यास शासनाकडून विलंब होत असल्याने बदलीपात्र शिक्षकात रोष पसरला आहे. काही शिक्षक या निर्णयाविरोधात असल्याने न्यायालयात जावून खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अनेक वर्षांपासून दुर्गम भागात सेवा देणाºया शिक्षकांना २७ फेब्रुवारीचा शासन निर्णय दिलासा देणारा असल्याने या निर्णयानुसारच बदलीप्रक्रिया राबविण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.या आंदोलनात बदली हवी टीमचे रवी सोयाम, लखन साखरे, योगेश रामटेके, चांगदेव पाझारे, नरेश बोरिकर, अतुल महाजन आदी शिक्षकांचा सहभाग होता. या आंदोलनाची दखल न घेतल्यास ४ ते ९ डिसेंबरला साखळी उपोषण करण्याचा इशारा बदली हवी टीमने दिला आहे.