लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २०१३ मध्ये मनपामध्ये झालेल्या कामांची चौकशी करुन कंत्राटदार तथा नगरसेवक राजीव गोलीवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी गुरुवारपासून जटपुरा गेटवरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.राजकीय दबावापोटी आमच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावे, मनपाची विद्युत चोरी, अवैध रेती उत्खनन, निकृष्ठ दर्जाचे काम होत असल्याने राजीव गोलीवार यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे, पाटबंधारे विभागतंर्गत गोलीवार यांनी केलेल्या कामाची चौकशी करावी, चौकशीसाठी आमच्या संघटनेतील तसेच शहरातील विविध संघटनांच्या सदस्यांना चौकशी समितीमध्ये स्थान द्यावे, अशा मागण्या राजेश बेले यांनी उपोषण आंदोलनातून केल्या आहेत.उपोषणाला नितीन गाडगे, महेश काहीलकर, आकाश साखरकर, गिरीष बेले, प्रवीण मोरे, सुभाष थोरात, शुभम मोगरे, शुभम पोटदुखे, प्रफुल्ल येनुरकर, रूपा वांढरे, विमल वाघमारे, अनु पिंपळकर, अंजनाबाई बावणे, अक्षय बेले आदी उपस्थित आहेत. उपोषणाच्या पहिल्या दिवशी अनेकांनी भेट दिली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दर्शविला.
नगरसेवक गोलीवार यांच्याविरोधात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:03 IST
२०१३ मध्ये मनपामध्ये झालेल्या कामांची चौकशी करुन कंत्राटदार तथा नगरसेवक राजीव गोलीवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी गुरुवारपासून जटपुरा गेटवरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.
नगरसेवक गोलीवार यांच्याविरोधात उपोषण
ठळक मुद्देराजेश बेले : कामांच्या चौकशीची मागणी