शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतीही गेली अन् मोबदला नाही

By admin | Updated: May 22, 2016 00:31 IST

लघु सिंचन विभागाच्या तलावासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरीत करुन घेतल्या कामही सुरू झाले.

आता जगायचे कसे : लघुसिंचन विभागाने केले शेतकऱ्यांना भूमिहीन जिवती : लघु सिंचन विभागाच्या तलावासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरीत करुन घेतल्या कामही सुरू झाले. जोमात काम सुरू असतानाच महसूल विभागाने आडकाठी टाकल्याने सिंचन तलावाचे काम तर बंद पडलेच. पण तलावासाठी जमिनी हस्तांतरित करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने मोबदलाही दिला नाही. उलट होती तेवढी शेती खोदून टाकली. परिणामी शेतकरी अडचणीत आला आहे. ना शेती, ना मोबदला. त्यामुळे आता जगायचे कसे, असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. सिंचन तलावासाठी शेती हस्तांतरीत करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहे. त्यांचं जगण केवळ शेतीच्या आधारावर आहे. होती तेवढी शेती तलावासाठी घेतली. जगण्याचा आधार हिरावून तर घेतलाच. पण १५ दिवसांत इस्टीमेट तयार करुन मोबदला देण्याचे आश्वासनही दिले. मागील वर्षीही शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. यावर्षीही करता येणार नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. जिवतीसह परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल. शेतीच्या बदल्यात मोबदला मिळेल व थोड्याफार शेतीत सिंचनाची व्यवस्था करता येईल, या आशेवर शेती हस्तांतरित करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. अनेकदा शेतीच्या मोबदल्या संदर्भात शेतकऱ्यांनी लघु सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, काम होईल. थोडा वेळ लागेल. काही दिवस पुन्हा थांबा, अशीच उत्तरे संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. गेल्या महिनाभरापासून सिंचन तलावाचे काम बंद पडल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या चिंता वाढली आहे. संबंधित अधिकारी कामावर येत नाहीत. मोबदला मिळाला नसल्याने जगण्याचा आधारही लघु सिंचन विभागाच्या तलावाने हिरावला आहे. आज शेतकरी पूर्णत: भूमिहिन झाला असून शेतकऱ्यांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित बाबीकडे लघुसिंचाई विभागाने तातडीने लक्ष देवून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शासनाच्या अशा धोरणामुळेच शेतकरी देशोधडीला लागल्याचा आरोप आता केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)