शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

तलाठ्याऐवजी शेतकरीच करणार आता पीक नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 05:00 IST

ग्रामीण भागात एकाच तलाठ्याकडे दोन ते तीन साजांचा प्रभार असतो. त्यामुळे तलाठी कधी या साज्याला, तर कधी त्या साज्याला जायचे. त्यामुळे नोंदणीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. बहुतेकदा पिकांमध्ये चुकासुद्धा व्हायच्या. परंतु, आता महसूल विभागाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ई-पीक पाहणी हे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाच शेतातील बांधावरून पीक नोंदणी करता येणार आहे.

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सात-बारावर पिकांची नोंदणी तलाठ्यांकडून करण्यात येत होती. मात्र यासाठी शेतकऱ्याला साजा कार्यालयाच्या खेटा माराव्या लागायच्या. त्यानंतरच तलाठी शेतात जायचे. त्यातही कधी कापूसऐवजी सोयाबीन, कधी धानाऐवजी गहू अशी चुकीच्या पिकांची नोंदणी करीत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून व्हायची. मात्र आता महसूल विभागाने डिजिटल तंत्राद्वारे नवे ई-पीक पाहणी ॲप तयार केले आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्याला स्वत:च्या पिकांची नोंदणी स्वत:च करता येणार आहे.  विशेष म्हणजे पिकांचा फोटोसुद्धा अपलोड करता येणार आहे. १५ ऑगस्टपासून हे ॲप शेतकऱ्यांना वापरता येणार आहे.शेतजमिनीच्या उताऱ्यावर पिकांची नोंदणी करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या नोंदणी्च्या आधारावरच शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. पूर्वी ही नोंदणी तलाठ्यांकडून केली जायची. परंतु, ग्रामीण भागात एकाच तलाठ्याकडे दोन ते तीन साजांचा प्रभार असतो. त्यामुळे तलाठी कधी या साज्याला, तर कधी त्या साज्याला जायचे. त्यामुळे नोंदणीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. बहुतेकदा पिकांमध्ये चुकासुद्धा व्हायच्या. परंतु, आता महसूल विभागाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ई-पीक पाहणी हे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाच शेतातील बांधावरून पीक नोंदणी करता येणार आहे. तसेच पीकांचे फोटोसुद्धा अपलोड करता येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सोईचे होणार आहे.

अशी करा पीक नोंदणीॲन्ड्राॅईड मोबाईलवरून क्यूआरकोड स्कॅन करून किंवा प्ले स्टोअरवरून पीक पाहणी ॲप डाऊनलोड करता येतो. त्यानंतर तेथे आपली वैयक्तिक माहिती भरून खातेदार म्हणून नोंदणी करायची. त्यानंतर मोबाईलवर आलेला चारअंकी क्रमांक भरावा. त्यानंतर पीक पेरणीची माहिती भरावी. पिकाचा फोटो अपलोड करावा. जेवढी पिके असतील त्या सर्वांची नोंदणी करावी. जर यामध्ये अडचण येत असल्यास तलाठी किंवा कृषी सहायकांशी संपर्क करावा. नोंदणीमध्ये पीक पेरणीनंतर दोन आठवड्यात वाढलेले पीक, पिकांची पूर्ण वाढलेली अवस्था, कापणी पूर्वीची अवस्था समाविष्ट करता येणार आहे. 

नुकसानभरपाई व पीकविमा मिळणे सोयीचेॲपद्वारे शेतकरी स्वत:च्या शेतातील पिकांची नोंदणी स्वत:च करणार आहे. त्यामुळे पिकांची अचूक नोंदणी होणार आहे. परिणामी नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानभरपाई आणि पीकविमा मिळणे सोपे होणार आहे.

इ पीक पाहणी हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. आधुनिक काळात शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची साथ देऊन सुलभ व अचूक सोयी पुरविण्याचा मानस आहे. इ पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांना स्वतःच आपल्या पिकाची अचूक माहिती भरता येणार आहे. हे ॲप वापरण्यास अत्यंत सोपे आहे. इ-पिकपाहणीमध्ये नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांना खातेनिहाय पिकांची नोंद, पीक कर्ज, पीक विमा, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई आदी सुविधा सुलभरित्या मिळणार आहेत. सर्व शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड करून आपल्या पिकांची नोंद करावी.-परिक्षित पाटील, तहसीलदार, सावली

 

टॅग्स :agricultureशेती