शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वितरणात हयगय सहन करणार नाही

By admin | Updated: July 18, 2016 01:55 IST

गत दोन वर्षापासून सतत दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

हंसराज अहीर यांचे निर्देश : शेतकऱ्यांना तातडीने कर्ज वाटप करा चंद्रपूर : गत दोन वर्षापासून सतत दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. चालू खरीप हंगामात प्रत्येक शेतकऱ्याच्या कर्जाचे पुनर्गठन करून त्याला तातडीने पीक कर्ज पुरवठा करावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँक प्रतिनिधींच्या बैठकीत दिले. या बैठकीत राष्ट्रीयकृत बँकाच्या अधिकारी व प्रतिनिधींसोबत खरीप पीक कर्ज वाटपाबाबत चर्चा केली. जिल्ह्यात राज्य शासनाने आदेश देवूनही शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन न केल्यामुळे मोठ्या संख्येत शेतकरी कर्जापासून वंचीत राहिल्याचे दिसून येत आहे. बँकांच्या अकार्यक्षमतेमुळे शेतकरी पीक कर्जापासून वंचीत राहत असल्याने यापुढे अशी स्थिती खपवून घेण्यात येणार नाही. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमधून तातडीने पीक कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. याप्रसंगी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी चर्चेत सहभागी होताना बँकांच्या अकार्यक्षमतेचा फटका शेतकऱ्यांना बसू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रसंगी बँक अधिकाऱ्यांवर कर्तव्यचुकारपणा केल्याबद्दल कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा दिला. केंद्र सरकारने पहिल्यांदाच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीला प्राथमिकता देण्याचे धोरण ठरविले असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. असे असतानाही बँकांमुळे कर्ज पुरवठा झाला नाही तर अशा शाखांमध्ये बहिष्कार घालण्याचे आवाहन करावे लागेल, अशी कठोर भूमिका ना. अहीर यांनी घेतली. बैठकीला आ. नाना श्यामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, आ. राजू तोडसाम, जि. प. सभापती देवराव भोंगळे, राहुल सराफ, राजू घरोटे, शेख जुम्मन रिझवी, बँकेचे अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)