शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचे पांढरे सोने मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:36 IST

शेतकऱ्यांवर कोणते संकट कधी येईल, याचा काही नेम नाही. चार-पाच दिवसांपूर्वी राजुरा तालुक्यातील धिडशी, मारडा, पेल्लोरा, चार्ली, निर्ली, वरोडा, कढोली परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटीचा चांगलाच तडाखा बसला.

प्रकाश काळे।ऑनलाईन लोकमतगोवरी : शेतकऱ्यांवर कोणते संकट कधी येईल, याचा काही नेम नाही. चार-पाच दिवसांपूर्वी राजुरा तालुक्यातील धिडशी, मारडा, पेल्लोरा, चार्ली, निर्ली, वरोडा, कढोली परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटीचा चांगलाच तडाखा बसला. यामुळे या भागातील शेतकºयांचे पांढरे सोने मातीमोल झाले आहे.शेतातील गहू, हरभरा, ज्वारी या रब्बीपिकांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला तर शेतकऱ्यांचे नगदी पिक समजले जाणारे कापूस वादळाच्या प्रचंड वेगाने झाडावरून उडाले. यावर्षी कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांअभावी कापसाची वेचणी करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा कापूस झाडावरच लोंबकळत राहिला. परिणामी कापूस झाडावरच उन्हाने सुकायला लागल्याचे चित्र परिसरात निर्माण झाले होते. कापूस वेचणीला मजूर नसल्याने शिवार कापसाचे पांढरे रान झाल्याचे सर्वत्र दिसत होते. अचानक वातावरणात बदल झाल्याने शेतकऱ्याची चांगलीच तारांबळ उडाली. शेतकरी आर्थिक सकटात सापडला असतानाच निसर्गाने शेतकऱ्यावर घाला घातला. अवकाळी वादळी पाऊस व गारपीटीने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. यावर्षी बोंडअळीने शेतकऱ्यांना खाल्यानंतर रब्बी पिकांनाही निसर्गाचा जबर तडाखा बसला. शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास निसर्ग कोपल्याने हिरावून गेला आहे.दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची आता निसर्गानेही साथ सोडली आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी आज कुणीही उभे राहायला तयार नाही. सारी परिस्थितीच शेतकऱ्याच्या विरोधात उभी ठाकल्याने शेतकऱ्यांना आज कोणाचाही आधार उरला नाही.