शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक शेतीतून बाहेर पडण्याची शेतकऱ्यांची धडपड; ३५० एकरात करडईची लागवड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 12:49 IST

Agriculture Chandrapur News यावर्षी नागभीड तालुका कृषी कार्यालयाने काही गावात काही शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्याने कडई लागवड करण्यात आली.

घनश्याम नवघडे    लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  धान उत्पादकांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागभीड तालुक्यात पहिल्यांदाच ३५० एकरात करडईची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रयोगाच्या यशस्वीतेकडे शेतकऱ्यांसोबत कृषी तज्ज्ञांचेही लक्ष लागले आहे. तालुक्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतल्या जाते. धानाचे पीक हातात आली की ओलिताची सोय असलेले शेतकरी गहू, हरभरा, लाख, लाखोळी, जवस, उडिद, मूग तसेच बांधावर तुरीचे पीक घेत होते. कोणत्याही शेतकऱ्याने मागील २५ वर्षांत करडईचे पीक घेतल्याचे उदाहरण नाही. मात्र यावर्षी तालुका कृषी कार्यालयाने काही गावात काही शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्याने कडई लागवड करण्यात आली. बीज प्रक्रिया कशी करावी, लागवड करताना दोन ओळीत अंतर किती ठेवावे आदी माहिती देण्यात आली.  करडई हा तेलवर्गीय गळीत पीक असून १२० दिवसात हातात येते. सध्या तालुक्यात प्रचलित असलेल्या इतर पिकांपेक्षा अनेक बाबतीत फायदेशीर आहे. करडईला बाजारात पाच हजार ते साडेपाच हजार प्रति क्विंटल भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी करडई लागवडलीला पसंती दिल्याचे दिसून येत आहे.

शासनाकडून ५ किलो बियाणे उपलब्ध करडईचे तेल हृदयरोगावर गुणकारी असल्याने करडईच्या तेलाला बाजारात मोठी मागणी आहे. करडईचे एकरी ५ किलो बियाणे शासनाने उपलब्ध करून दिले.  तालुक्यात हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढील हंगामात करडईचा पेरा वाढू शकतो. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

 करडई काटेरी असल्याने जनावरांपासून पिकाचे राखण करण्याची गरज नाही. संरक्षण होते. हे पीक हरभऱ्याच्या तुलनेत कमी खर्चाचे आहे. शिवाय पाणीही कमी लागते. याशिवाय किडींचा प्रतिकार करण्याची क्षमता  जास्त आहे.-एन. व्ही. तावस्कर,  तालुका कृषी अधिकारी, नागभीड

टॅग्स :agricultureशेती