शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

वेकोलिविरोधात शेतकरी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:52 IST

वेकालिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या कोळसा खाण परिसरातील नाला वळविण्यासाठी खाणीतून निघणाºया मातीचे ढिगारे उभे केले जात आहे. आधीच या ढिगाऱ्यामुळे वर्धा नदीला येणाऱ्या पुरामुळे सास्ती गावाला धोका निर्माण होत असतानाच ....

ऑनलाईन लोकमतसास्ती : वेकालिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या कोळसा खाण परिसरातील नाला वळविण्यासाठी खाणीतून निघणाºया मातीचे ढिगारे उभे केले जात आहे. आधीच या ढिगाऱ्यामुळे वर्धा नदीला येणाऱ्या पुरामुळे सास्ती गावाला धोका निर्माण होत असतानाच पुन्हा नाला वळविण्याने भविष्यात कृत्रिम पुरस्थिती निर्माण होऊन सास्ती गावासोबतच रामनगर, कोलगाव, मानोली व बाबापूर या गावांना मोठा फटका बसणार आहे. याची कल्पना आल्याने येथील शेतकऱ्यांनी नाला वळविण्याच्या व मातीचे ढिगारे उभे करण्याविरोधात शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटिका विजयालक्ष्मी रोंगे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.सास्ती खुल्या कोळसा खाणीतील माती उत्खनन केल्यानंतर ती टाकण्यासाठी वेकोलिने सास्ती गावाजवळ अधिग्रहीत केलेल्या जमिनीवर टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कामही सुरु केले. परंतु, या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे वर्धा नदीला येणाºया पुरात सास्ती गावातील अनेक घरात पाणी शिरत होते. आता सास्ती शेजारच्या मोठा नाला आपल्या सोईनुसार वळविण्याचे काम वेकोलिने हाती घेतले. त्यामुळे भविष्यात कृत्रीम पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सास्ती सोबतच रामनगर, कोलगाव, मानोली व बाबापूर या गावांना सुद्धा पुराचा धोका निर्माण होऊन परिसरातील शेती पाण्याखाली येवू शकते. यातून मोठे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहे.त्यामुळे शिवसेनेच्या विजयालक्ष्मी रोंगे यांनी नाला वळविण्याचे काम बंद करण्याबाबतचे निवेदन वेकोलि व जिल्हा प्रशासनाला दिले होते. परंतु यावर कोणताही तोडगा न निघाल्यामुळे गुरूवारी सकाळी ११ वाजता सास्ती चेकपोस्ट वरुन कार्य सुरु असण्याच्या ठिकाणापर्यंत शेतकऱ्यांनी मोर्चा काढला.याप्रसंगी शिवसेना राजुरा शहर प्रमुख आदित्य भाके, शिवसेना उपतालुका प्रमुख विनोद कावळे, प्रदीप रोगे, यशवंत लांडे, सतिश बोबडे, राहुल काळे, मोहन काळे, भास्कर चौधरी, रवींद्र बोबडे, प्रशांत भोंगळे, सोनु निब्रड, सचिन लांडे, रुपेश नक्षिणे, बबन लांडे, प्रकाश रोगे, ओम काळे यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील शेतकरी व गावकरी उपस्थित होते. यावेळी वेकोलिच्या सास्ती खाणीचे व्यवस्थापन रविंद्र ठुणे व क्षेत्रीय नियोजन अधिकारी पुलय्या यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. येत्या १७ मार्चला वेकोलिच्या वरिष्ठांशी बैठकीचे आयोजन करुन शिष्टमंडळाच्या वतीने मांडलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.या बैठकीत तोडगा न निघाल्यास शिवसेनेच्या वतीने मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.