शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

शेतकऱ्याचे चूल बंद आंदोलन सुरू

By admin | Updated: June 5, 2017 00:22 IST

राज्यभरात शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आल्याने शेतकरी संपावर गेले आहे.

तहसीलदारांना निवेदन : भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांचा संपात सहभागलोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : राज्यभरात शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आल्याने शेतकरी संपावर गेले आहे. या संपाबाबत सर्वत्र संभ्रम निर्माण केला जात असला तरी भद्रावती तालुक्यातील शेतकरी बांधव या संपात सहभागी होत असल्याचे निवेदन विविध संघटनांकडून तहसीलदारांना दिले आहे. या संपाला पाठिंबा म्हणून वडेगाव येथील माधव जीवतोडे या शेतकऱ्याने तर आज रविवारपासून आपली चूल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.शेतकरी संपाचे लोण चंद्रपूर जिल्ह्यातही पोहचू लागले आहे. अशातच अचानक या संपाबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण केली जात आहे. असे असले तरी भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांनी मात्र संपात सहभागी होत असल्याचे म्हटले आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून त्यांनी तीन प्रमुख मागण्या रेटून धरल्या आहेत. यात संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागु करण्यात याव्या, ६० वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन लागू करण्यात यावे यांचा समावेश आहे. भद्रावती तालुक्यातील शेतकरी होणाऱ्या अन्यायामुळे त्रस्त आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून निघेल, एवढा भाव मिळत नाही. दुधालासुध्दा काडीमोल भाव आहे. याचा परिणाम म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. शेतकरी निराश होऊन संपासारख्या अस्त्राचा वापर करण्यास पुढे आला आहे. या राज्यव्यापी शेतकरी संपाच्या आंदोलनात भद्रावती तालुकयातील शेतकरीसुध्दा सहभागी होत असल्याचे म्हटले आहे. तालुक्यातील वडेगाव येथील माधव जीवतोडे या शेतकऱ्याने तर शासकीय धोरणाला कंटाळून रविवारपासून चुल बंद आंदोलन सुरु केले आहे. आज त्यांच्या घरात चुलच पेटविण्यात आली नाही.