शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी श्री पद्धतीचा अवलंब करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:11 IST

शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच धान पिकाची लागवड करताना ‘श्री’ पद्धतीने धानाची लागवड करून एक रोपटे २५ ते ३० सेंटीमीटर अंतरावर धानाचा रोपे लावावे, त्यामुळे उत्पन्नात वाढ होत असते, असे प्रतिपादन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा विभागाच्या प्रकल्प संचालिका विद्या मानकर यांनी केले.

ठळक मुद्देविद्या मानकर : भीमनी येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवाडा बुज : शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.तसेच धान पिकाची लागवड करताना ‘श्री’ पद्धतीने धानाची लागवड करून एक रोपटे २५ ते ३० सेंटीमीटर अंतरावर धानाचा रोपे लावावे, त्यामुळे उत्पन्नात वाढ होत असते, असे प्रतिपादन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा विभागाच्या प्रकल्प संचालिका विद्या मानकर यांनी केले.पोंभुर्णा तालुका अंतर्गत येत असलेल्या भीमनी येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तथा तालुका कृषी अधिकारी पोंभुर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेतंर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पार पडली. यावेळी त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या.कार्यक्रमाचे उद्घाटन पोंभुर्णा पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुशीकांत गाडेवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषीसहाय्यक संतोष कोसरे, हिराचंद परशुराम कोहपरे, कृषीतंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे बी.टी. एम. एन. डी पेंदाम, प्रफुल पाथरे, कृषीमित्र निखील तिमांडे, सुभाष काळे, भाऊजी कोहपरे आदी उपस्थित होते.शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी व भात पिकावरील तुडतुडे किडीचे व्यवस्थापनावरील सनियंत्रण याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आत्माच्या प्रकल्प संचालिका विद्या मानकर म्हणाल्या कापूस हंगामात चोर बिटी बियाणाची खरेदी करु नये, धानपिकावर तुडतुडा नावाच्या रोगाचा प्रादूर्भाव आहे. शेतकºयांनी कीटकनाशक फवारणी काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे रब्बी हंगामात घेण्यात येणाºया पिकांसाठी उच्च प्रतीच्या बियाण्याची लागवड करावी, त्यातून योग्य उत्पादन होण्यास मदत होते, असे प्रतिपादन केले.तर कृषी अधिकारी सुशीकांत गाडेवार यांनी शेतकरी प्रशिक्षणाच्या दृष्टीकोनातून अनुसुचित जाती जमाती शेतकºयांच्या हितासाठी कृषी विषयक योजनेची माहिती देऊन या योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन नियंत्रणातंर्गत धान पिकावरील तुडतुडे नावाच्या रोगाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात मार्गदर्शन केले होते. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.शेतकरी प्रशिक्षणात अनेक शेतकºयांनी सहभाग नोंदविला होता. संचालन संतोष कोसरे यांनी केले तर आभार एन.डी. पेंदाम यांनी मानले. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.