शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वनसडीच्या बँकेत शेतकऱ्यांची रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:06 IST

औद्योगिक व शेतीप्रधान तालुका म्हणून कोरपना तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील वनसडी येथे बँक आॅफ इंडियाची एकमेव शाखा आहे. येथील इंटरनेट लिंक तांत्रिक कारणासाठी शुक्रवारी दिवसभर बंद असल्याने शेतकरी ग्राहकांना कामधंदे सोडून ताटकळत रहावे लागले. बँक बंद होण्याची वेळ झाली असतानाही लिंक सुरू न झाल्याने आल्या पावली ग्राहकांना रिकाम्या हाताने घरी जावे लागले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देग्राहक रिकाम्या हाताने परतले : दिवसभर लिंक नसल्याने कामकाज ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : औद्योगिक व शेतीप्रधान तालुका म्हणून कोरपना तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील वनसडी येथे बँक आॅफ इंडियाची एकमेव शाखा आहे. येथील इंटरनेट लिंक तांत्रिक कारणासाठी शुक्रवारी दिवसभर बंद असल्याने शेतकरी ग्राहकांना कामधंदे सोडून ताटकळत रहावे लागले. बँक बंद होण्याची वेळ झाली असतानाही लिंक सुरू न झाल्याने आल्या पावली ग्राहकांना रिकाम्या हाताने घरी जावे लागले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.इंटरनेट लिंकवर सर्व बँकिंग व्यवहार अवलंबून आहे. संपूर्ण आर्थिक देवाण-घेवाणीचे व्यवहार लिंक नसल्याने ठप्प पडत आहे. दि. १५ ला सकाळी १०.३० वाजेपासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मोठ्या संख्येने ग्राहक या बँकेत पैसे काढण्यासाठी तसेच इतर कामांसाठी आले होते. मात्र दिवसभर वाट पाहूनही काहीेच फायदा झाला नाही. इंटरनेट लिंक संबंधात अनेकवेळा असाच प्रकार येथे घडत असल्याने ग्राहक या बँकेच्या व्यवहाराला त्रस्त झाले आहे. विशेष म्हणजे, बँकेतील एटीएमसेवाही बंद असल्याने पैसा काढायचे कुठून असा प्रश्न येथील ग्राहकांना पडला. या बँकेच एकच कॅश काऊंटर असल्याने अन्य दिवशीही ग्राहकांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. एकमेव बँक असल्याने ग्राहकांची संख्या मोठी आहे. मात्र त्या तुलनेत येथे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास बँक व्यवस्थापन कमी पडले आहे. यासंदर्भात ग्राहकांनी अनेकवेळा तक्रारही केल्या आहेत. मात्र उपयोग झाला नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे असून येथे कर्मचाऱ्यांचीही संख्या कमी आहे. त्यामुळे इतर दिवशीही ग्राहकांना कामाशिवाय वापस जावे लागते. त्यामुळे ग्राहक सकाळपासून या बँके परिसरात रांगेत उभे राहून आपला नंबर लावतात.गरिबांना फटकावनसाडी बँक आॅफ इंडिया कार्यक्षेत्रात अनेक अतिदुर्गम व आदिवासीबहुल गावे आहे. तेथील नागरिकांना ही एकमेव जवळची बँक आहे. परंतु येथे कामे लवकर होत नसल्याने त्याचा फटका गरीब शेतकºयांना बसत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने लग्नकार्य तसेच इतर कामासाठी पैसे काढण्यासाठी ग्राहक येतात मात्र त्यांना निराश व्हावे लागत आहे.