शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक

By admin | Updated: July 7, 2016 00:49 IST

मागील तीन वर्षापासून नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पिककर्जाचे पूनर्गठन करण्याचे आदेश बँकांना दिले.

गुंजेवाही : मागील तीन वर्षापासून नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पिककर्जाचे पूनर्गठन करण्याचे आदेश बँकांना दिले. पण सिंदेवाही येथील राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचा प्रकार येथे चालविला आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या पककर्जाच्या पूनर्गठनाचा मार्ग अद्याप मोकळा झाला नसून अनेकजण पिक कर्जापासून वंचित आहेत.दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार असल्याचा प्रतिक्रिया येथे उमटत आहे. शेतकऱ्यांकडे असलेली थकबाकी पाहता बँका कर्जाचे पूनर्गठन तथा शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करण्यासंदर्भात उदासीन धोरण असल्याचे दिसून येते. शासनही दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यास असमर्थ ठरले आहे. त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करीत त्यांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न बँकांच्या अडवणुकीमुळे फसला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी परत खाईत लोटला जाणार नाही. खासगी सावकाराकडे जाऊन त्याला गरज भागवावी लागणार आहे. कर्जाच्या पूनर्गठणासाठी शेतकरी बँकांचे उंबरडे झिजवित आहे. पण त्यांना बँकेतून परत पाठविल्या जात आहे.राज्यातील किमान ८० टक्के शेतकऱ्यांना पिकर्जाच्या कक्षेत आणण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी केली. पण विदर्भातील बँकांना रिझर्व्ह बँकेने निधी उपलब्ध करुन दिला नसल्याने पिक कर्जाचे वाटप रखडल्याची माहिती आहे. सोबतच सन २०१२ ते २०१४ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या पिककर्जाच्या पुनर्गठनाचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने निकाली न काढल्याने पूनर्गठनसुद्धा थांबले आहे. (वार्ताहर)