शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी तेलंगणात धाव

By admin | Updated: June 19, 2014 00:02 IST

गेल्या आठवडापूर्वी तेलंगणा सरकारनी राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी केली. यानंतर आता बियाणे खरेदीसाठी सबसिडी दिली जात आहे. यामुळे बियाणे व खतांच्या कमी दरात उपलब्धीमुळे शेतकऱ्यांनी

वनसडी : गेल्या आठवडापूर्वी तेलंगणा सरकारनी राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी केली. यानंतर आता बियाणे खरेदीसाठी सबसिडी दिली जात आहे. यामुळे बियाणे व खतांच्या कमी दरात उपलब्धीमुळे शेतकऱ्यांनी तेलंगणातील कृषी केंद्राकडे धाव घेतली आहे.महाराष्ट्रातील कृषी केंद्रातील बियाणे व खतांच्या दरात व तेलंगणातील कृषी केंद्राच्या दरात बरीच तफावत आहे. सध्या तेलंगणात सबसिडीप्रमाणे एक हजार ६०० रुपयांत सोयाबिनची ३० किलोची बॅग विकली जाते. त्यामुळे येथील सहकारी सोसायट्यांत गर्दी वाढली गेली आहे.चंद्रपूर जिल्ह्याशेजारच्या बेला, आदिलाबाद, आसिफाबाद बाजारपेठेतील कृषी केंद्रात अशीच गर्दी दिसून येते. बियाणे खरेदी करून नेण्याचा खर्च पकडूनही पैशाची बचत होत असल्याने शेतकऱ्यांनी ही वाट पकडल्याचे दिसते. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पिकांवरील किडींमुळे शेतकऱ्यांना दुहेरी मार बसल्याने उत्पादनात घट आली. वारंवार बसणाऱ्या फटक्यांमुळे शेतकरीही आर्थिक संकटात सापडला गेला. कसेबसे उसणवारी करून आता शेतकरी बीज पेरणीच्या कामी लागला आहे. पाऊसही लांबणीवर गेल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा नैसर्गिक संकट ओढवले तर परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची चिन्हे आहे. नानाविध कंपन्यांनी आपला प्रचार गावागावात चालविला आहे. शेतकऱ्यांना पटविण्यासाठी विविध प्रलोभणे देऊन बियाणे खरेदीसाठी आकृष्ठ केले जात आहे.मागील वर्षी पावसामुळे सोयाबिनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात खराब झाले. त्यामुळे बाजारपेठेत बोगस बियाणांनी शिरकाव केला आहे. अशा परिस्थितीत बीजाई उगवली नाही तर पुन्हा बियाणे खरेदी करून पेरणी करणे न परवडणारे आहे. महागडी बियाणे खरेदी करूनही पीक उगवलेच नाही तर उपयोग काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे. त्यामुळे बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील बाजारपेठांपेक्षा तेलंगणातील बाजारपेठांतील कृषी केंद्रात शेतकरी मोठ्या संख्येने धाव घेत आहे. (वार्ताहर)