शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ...

ठळक मुद्दे२४ जुलै शेवटची तारीख : कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरीही होऊ शकणार सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी २४ जुलै या अंतिम दिनांकापूर्वी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, योजनेतील सहभागासाठी तात्काळ जवळच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत कर्जदार व बिगार कर्जदार शेतकºयांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत २४ जुलैपर्यंत निश्चित केलेली आहे.या योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित पीकासाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामातील पिकांसाठी २ टक्के व नगदी पिकासाठी ५ टक्के असा आहे. सर्व पिकासाठी जोखिमस्तर ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. कर्जदार शेतकºयांनी सदर योजना बंधनकारक आहे. अशा शेतकऱ्यांना कर्ज मंजूर कालावधी १ एप्रिल ते ३१ जुलै २०१९ आहे. अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र ठरणार आहेत.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सन २०१९-२० साठी सर्वसाधारणपणे जिल्हास्तरीय पीक कर्ज दर समितीने निश्चित केलेले दराप्रमाणे विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के व नगदी पिकाकरिता ५ टक्के विमा हप्ता हा शेतकऱ्यांना भरावयाचा आहे.विमा संरक्षणाच्या बाबी प्रतिकुल हवामान घटकामुळे पेरणी, लावणी, उगवण न होणे, हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत झालेले नुकसान, पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान योजनेमध्ये सहभाग घेणेसाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करताना सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमाच्या अर्जासोबत पीक पेरा प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांनी आपले फोटो असलेल्या बँक खाते पुस्तकाची प्रत तसेच आधार कार्ड छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. आधार कार्ड उपलब्ध नसल्यान आधारकार्ड नोंदणी पावतीसह ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.खरीप हंगाम २०१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना व फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बँकेचे कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरित बँकेशी संपर्क साधावा.बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता आधार क्रमांकाशी जोडले गेलेले बँक खाते क्रमांकच अर्जावर नमूद करावा लागणार आहे. या संदर्भात ज्या शेतकऱ्यांकडे अद्यापही आधार कार्ड उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांनी त्वरित आधार नोंदणी केंद्राशी संपर्क करून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून आधार क्रमांक घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.योजनेत समाविष्ट पिकेया योजनेंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण मिळेल. सदर योजना राज्यात शासनाने खरीप २०१९ हंगामासाठी केलेल्या महसूल मंडळ, मंडळगट किंवा तालुकास्तरावर पिकांसाठी राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा