शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायाविरुद्ध शेतकऱ्याचे बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:10 IST

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : जमिनीचा मालकी हक्क डावलल्याच्या निषेधार्थ गवर्ला (चक) येथील आसाराम सखाराम सोनडवले या शेतकऱ्याने रविवापासून मांगली ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले.आसाराम सोनडवले यांना अन्य शेतकऱ्यांसह १९६० मध्ये जमीन मिळाली. त्यावेळी ही जमीन भोगवटदार दोनमध्ये होती. दरम्यान, तत्कालिन तहसीदार व तलाठ्याने शासकीय परिपत्रकाचा आधार घेवून अन्य शेतकऱ्यांसोबत ही जमीन ...

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : वर्ग एकची जमीन दोनमध्ये करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : जमिनीचा मालकी हक्क डावलल्याच्या निषेधार्थ गवर्ला (चक) येथील आसाराम सखाराम सोनडवले या शेतकऱ्याने रविवापासून मांगली ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले.आसाराम सोनडवले यांना अन्य शेतकऱ्यांसह १९६० मध्ये जमीन मिळाली. त्यावेळी ही जमीन भोगवटदार दोनमध्ये होती. दरम्यान, तत्कालिन तहसीदार व तलाठ्याने शासकीय परिपत्रकाचा आधार घेवून अन्य शेतकऱ्यांसोबत ही जमीन वर्ग एकमध्ये करण्यात आली. पण, काही कालावधीनंतर सोनडवले यांच्याच जमिनीवर अटी लावल्या. अन्य जमीन धारकांबाबत शर्ती लावल्या नाहीत. त्यामुळे मालकी हक्कावर गदा आली आहे. वर्ग दोनचा पेरा काढावा आणि वर्ग एकमध्ये करावी, अशी मागणी सोनडवले यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, दखल घेण्यात आली नाही. प्रशासनाच्या चुकीमुळेच हा प्रकार घडला. त्याला प्रशासनच दोषी आहे. त्यामुळे सोनडवले यांनी रविवारपासून मांगली ग्रा. पं. समोर आमरण उपोषण सुरु केले. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही सोनडवले यांनी व्यक्त केला आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, उपविभागीय अधिकारी, आमदार विजय वडेट्टीवार, तसेच ठाणेदारांना निवेदनाच्या प्रती देऊन शासनाने लक्ष वेधले आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे जमिनीच्या हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे आंदोलनाचे पाऊल उचलले. जिवाला धोका झाल्यास प्रशासनच जबाबदार राहील, असेही सोनडवले यांनी निवेदनात नमूद केले आहे.