शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

शेतकऱ्यांच्या नशिबी मातीचे ढिगारेच

By admin | Updated: February 24, 2016 00:49 IST

गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला असा तरी, ...

गोसेखुर्दचा घोडाझरी उपकालवा : वनवास संपता संपेनाघनश्याम नवघडे  नागभीडगोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला असा तरी, या तालुक्याला त्याचा फायदा काहीच झालेला नाही. मात्र या कालव्याच्या रुपाने मृत्यूचे दरवाजे आणि मातीचे ढिगारे या तालुक्याच्या नशिबी आले आहेत.पूर्व विदर्भातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गोसेखुर्द प्रकल्पाची ख्याती आहे. या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यताही मिळाली आहे. याच प्रकल्पाचा सर्वात मोठा आणि १०७ कि.मी लांबीचा उजवा कालवा ब्रह्मपुरी तालुक्यातून सावलीकडे गेला आहे. या कालव्याच्या माध्यमातून यावर्षी आसोला मेंढा या तलावात पाणी सोडण्यात आले आणि त्याचे परिणाम यावर्षी सावलीवासीयांना दिसू लागले आहे. नागभीड तालुक्यातील घोडाझरीत पाणी सोडण्यासाठी घोडाझरी उपकालव्याचे नियोजन करण्यात आले. सहा-सात वर्षांपूर्वी या उपकालव्याचे कामही सुरू करण्यात आले. मात्र हे काम अर्धवटच आहे. नागभीड तालुक्यातून हा कालवा पान्होळी, मेंढा, किरमिटी, नवेगाव पांडव, कोदेपार येथून गेला असून कालव्यातून निघालेल्या मातीची विल्हेवाट लावण्यासाठी मातीचे डोंगर तयार करण्यात आले आहेत. शेतात मातीचे डोंगर तयार झाल्याने शेकडो एकर जमीन नापिकी झाली आहे. एवढेच नव्हे तर या अर्धवट कालव्याच्या रुपाने शासनाने या तालुक्यातील लोकांसाठी मृत्यूचे दरवाजे उघडून दिले आहेत. गेल्या तीन चार वर्षात तालुक्यातील नवेगाव पांडव आणि मौशी येथे घडलेल्या घटनांनी हे सिद्ध होते.असे असूनही नागभीड तालुक्याला या कालव्याचा म्हणा किंवा प्रकल्पाचा म्हणा फायदा काय, असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे उत्तर शुन्य असेच देता येईल. मौशीपासून तर बाळापूरपर्यंत ४२ गावे या प्रकल्पाच्या सिंचनापासून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचा नागभीड तालुक्यात सिंचन होण्याची सूतभरही शक्यता नाही. या कालव्याच्या रुपाने ठिकठिकाणी निर्माण झालेले मातीचे डोंगर पाहणे, अनवधानाने का होईना या कालव्यात मरण पावणे आणि सततच्या नापिकीला व कर्जाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग पत्करणे एवढेच या तालुक्यातील लोकांच्या नशिबी आले आहे, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरु नये. शेतकऱ्यांचा झाला हिरमोडसिंचनाचा या तालुक्यात कोणताच फायदा नसला तरी या कालव्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन कवडीमोल भावाने अधिग्रहीत करण्यात आली. काही शेतकऱ्यांना तर अद्याप मोबदलाही मिळाला नसल्याचे समजते. खरे तर नागभीड तालुक्याला सिंचनाच्या कोणत्याही सोयी नाहीत. पुर्णत: नैसर्गिक पावसावर येथील शेती अवलंबून आहे. या प्रकल्पाला मान्यता मिळाली आणि काम सुरू झाले तेव्हा, या तालुक्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण नंतर या तालुक्यातील ४२ गावांचा या प्रकल्पात समावेशच नाही, ही सत्यता समोर आल्याने येथील शेतकऱ्यांचा पुरता हिरमोड झाला.