शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक मदतीअभावी शेतकरी गट हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:31 IST

शेतकऱ्यांनी संघटीत होऊन कृषीगट तयार केले. अशा गटांना शासनाकडून विविध योजनांसाठी आर्थिक निधी दिला जातो. मात्र निधी न मिळाल्याने शेतकरी गटांची विकास कामे ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : कृषिपूरक प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांनी संघटीत होऊन कृषीगट तयार केले. अशा गटांना शासनाकडून विविध योजनांसाठी आर्थिक निधी दिला जातो. मात्र निधी न मिळाल्याने शेतकरी गटांची विकास कामे ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.पारंपरिक शेतीपासून काहीच मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कृषीगट स्थापन केले. या गटाद्वारे आर्थिक उत्पन्न वाढविणाऱ्या अनेक योजनांचा लाभ घेता येतो. गटांची स्थापना करण्यासाठी कृषी विभागाने सहकार्य केले होते.या गटाद्वारे विकास योजनांचा लाभ मिळेल, असे वाटत होते. पण निधी मिळत नसल्याने कृषीपूरक कामांना गती आली नाही. शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल अल्पदरात व्यापाऱ्यांच्या घशात गेल्यास मोठे आर्थिक नुकसान होते. या भितीपोटी शेकडो शेतकरी एकत्र आले. शेतमाल बाजारात थेट न विकता यापासून मूल्यवर्धन कसे करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांने प्रशिक्षणाद्वारे विविध योजनांची माहिती दिली. अभ्यास दौरेही झाले. परंतु, उत्पन्न वाढविणारे कृषीवर आधारीत लघुउद्योग उभारताना शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात शेतमालाचा मूल्यवर्धनाची प्रक्रिया जिल्ह्यात पुढे जाऊ शकली नाही. काही शेतकऱ्यांनी सामूहिक श्ोतीसाठी यंत्रसामग्री विकत घेतली. काही गटांकडे टॅÑक्टर आहेत. पण, आर्थिक विकासासाठी याचा पुरेसा वापर करता येत नाही. इच्छा असूनही पैशाअभावी रखडलेली कामे पूर्ण करणे कठीण झाले. त्यामुळे शेतकरी गटांमध्ये निराशा पसरली आहे.प्रकल्पाची तांत्रिक, पायाभूत कामे ठप्पसहा तालुक्यातील शेतकरी गटांनी प्रक्रिया उद्योगासाठी यंत्रणा उभारली. याकरिता शासनाकडून आर्थिक मदत मिळाली. पायाभूत कामे झाली. मात्र वीज आणि अन्य तांत्रिक उपकरणे मिळाली नाही. त्यामुळे प्रकल्प कसा पुढे न्यावा, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.मूल्यवर्धनाकडे शेतकऱ्यांचा कलपारंपरिक शेतीमुळे आर्थिक लाभ होत नाही, हे शेतकऱ्यांना कळू लागले आहे. यामुळे नवीन तंत्रज्ञान व मूल्यवर्धन लहान प्रकल्पाकडे शेतकरी आकर्षित झाला. त्यामुळे अशा प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची गरज आहे.