शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाला शेतकऱ्यांची भेट

By admin | Updated: August 7, 2015 00:07 IST

शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांनी तेलंगणा राज्यात अभ्यास दौरा करून गांडुळ खताची माहिती जाणून घेतली.

जिवती : शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांनी तेलंगणा राज्यात अभ्यास दौरा करून गांडुळ खताची माहिती जाणून घेतली. उदासिनता, सततची नापिकी, सावकारी कर्ज, शेतीची ढासळणारी पोत, रासायनिक खताचा भरमसाठ वापर, जास्त व्यय व लाभ कमी या बाबी डोळ्यासमोर ठेवून लोकसमग्रह समाज सेवा संस्था बल्लारपूरच्या व आईजीएसएसएस यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिविका विकास प्रकल्प अंतर्गत जिवती तालुक्यातील खडकी, चिखली व पुनागुडा या ग्रामपंचायतीमधील १५ गावातील शेतकऱ्यांनी अभ्यास दौरा केला. तेलंगा राज्यातील इंद्रावली येथील प्रतिष्ठीत शेतकरी दयानंद पाटील यांच्या गांडुळ खत निर्मिती प्रकल्पाला शेतकऱ्यांनी भेट दिली. दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनात गांडुळ खत कसे तयार केले जाते, निंबोळी अर्क फवारणी, गोमुत्र फवारणी करुन कापूस, तूर, भाजीपाला व इतर मिश्र पीक चांगल्या प्रकारे घेत असल्याचे यावेळी सांगितले. तसेच गांडुळ खत निर्मिती व विक्री यापासून दर महिन्याला ५० हजार रुपये नफा मिळविण्याचे कौशल्य प्राप्त केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची प्रगती पाहून एक उत्कृष्ठ शेतकरी म्हणून आंध्रप्रदेश, कनार्टक, महाराष्ट्र व गुजरात राज्यामधून विविध पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले. संस्थेचे संचालक फा. जोबीन ओवेलील यांनी शेतकऱ्यांनी अशा अभ्यास दौऱ्यातून प्रेरणा घेऊन शेतीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे व कमी खर्चात शेतीची उपजावू शक्ती गांडूळ खताच्या माध्यमातून प्रयत्न करावा असे सांगितले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)