शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: October 7, 2014 23:31 IST

मागील एक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वरोरा तालुक्यात नागरी उपविभागीय कार्यालयावर मंगळवारी सकाळी ७ वाजता धडक मोर्चा काढून

नागरी (रेल्वे) : मागील एक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वरोरा तालुक्यात नागरी उपविभागीय कार्यालयावर मंगळवारी सकाळी ७ वाजता धडक मोर्चा काढून येथील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बंदी बनविण्याचा प्रयत्न केला.माढेळी पॉवर स्टेशनअंतर्गत नागरीसाठी असलेल्या मेन लाईनवर माढेळी भागाचे १५ ट्रान्सफार्मर जोडल्या गेले. येथे कनिष्ठ अभियंता नाही, कर्मचारी वर्ग अपुरा आहे. यामुळे महावितरणने नागरी परिसर वाऱ्यावर सोडला आहे. कोणीही लक्ष द्यायला तयार नसल्याने वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेतकरी रस्त्यावर उतरले. आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा विपरीत परिणामाला सामोरे जा, अशी भूमिका घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. जमावाला पांगविण्यासाठी घटनास्थळावर पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे पोहोचले. जमावाला शांत करण्यासाठी त्यांनी कार्यकारी अभियंता सराफ, उपकार्यकारी अभियंता नागदेवते यांना घटनास्थळावर बोलविले. पण ते न आल्याने दूरध्वनीवर त्यांच्यासोबत चर्चा करुन दोन दिवसांत असलेली अडचण दूर केल्या जाईल, असे आश्वासन दिले आणि जमाव शांत करण्यास त्यांनी महत्वाची भूमिका निभवली. वास्तविक या महिन्याभरात शेतकऱ्यांना ओलीत करतान न आल्याने शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे करपले. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. या मोर्चामध्ये दिलीप टिपले, चंद्रशेखर नोकरकर, इस्तेखा पठाण, विनोद वाटमोडे, प्रमोद धात्रक, शरद भलमे, बुरीले, उदयसिंग दीक्षित यांच्यासह हजारो शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)