शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी महासंघाचा शेतकरी मेळावा

By admin | Updated: January 16, 2017 00:44 IST

स्वदेशी महासंघाच्या वतीने राजूरा येथील किसान भवनात शनिवारला सकाळी ११ वाजता शेतकरी मेळावा पार पडला.

वनौषधीची शेती करावी : अनेक शेतकऱ्यांची उपस्थितीबाखर्डी : स्वदेशी महासंघाच्या वतीने राजूरा येथील किसान भवनात शनिवारला सकाळी ११ वाजता शेतकरी मेळावा पार पडला. सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अरूण धोटे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वदेशी महासंघाचे अ‍ॅड कांचन कोतवाल तर प्रमुख पाहुणे राष्ट्रीय संचालक रत्नाकर हजारे, जिल्हा रा.सं महासंघाचे प्रमोद अलोने, रा.सं महासंघाचे अभय ढेंगे, प्रा.उमेश राजुरकर आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना अ‍ॅड कांचन कोतवाल म्हणाले, शेतमालाला पुरेसा भाव मिळत नाही. त्यामुळे शेती व्यवसाय नेहमीच तोट्यात येतो. याचे मुख्य कारण देशात धानाचे उत्पादन गरजेपेक्षा तिन पट होते. आणि भाव मागणी पुरवठयाच्या सिद्धांतानुसार ठरवीले जातात. सेंद्रीय खताच्यासह्याने पिकवलेल्या धान्याला देशात व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. पण विदर्भातील शेतकरी मात्र रासायनिक खताच्या सह्याने शेती करतात. सेद्रीय विषमुक्त शेती केल्यास योग्य भाव मिळू शकतो. व त्याद्वारे शेतकरी समृद्ध होऊ शकतो. याच उद्देशाने शेतकऱ्यांची उन्नती व्हावी, याकरिता स्वदेशी महासंघाची स्थापना झाली. स्वदेशी महासंघ शेती ही भाडे तत्त्वावर घेतो व वनऔषधीची लागवड करतो, त्याकरिता शेतकऱ्यांना वरपाणी कोरडवाहू शेती १५ हजार रूपये, कोरडवाहू जमिनीसाठी २५ हजार रूपये, तर बारमाही ओलीतासाठी ५० हजार रूपये प्रती एकरी एक वर्षासाठी देण्यात येते. तसेच शेतकऱ्यांना शेतीत काम करण्याची संधी पण दिली जाते. त्यासाठी त्यांना मासिक वेतन व मानधन देण्यात येते. याकरिता महासंघाने मोठी फळी उभी केली आहे. त्यामुळे गावं खेड्यातील तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असे वक्तव्य केले.यावेळी राष्ट्रीय संचालक प्रमोद अलोने म्हणाले, सध्या संपूर्ण देशातच नाही तर जगात आयुर्वेदिक औषधीची मागणी मोठया प्रमाणात आहे. परंतु त्यांचा पुरवठा अत्यल्प आहे. जर शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती बदलून औषधी शेती केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक चित्र बदलू शकते.अध्यक्षीय भाषणामध्ये अरूण धोटे म्हणाले, वनोऔषधी शेती ही स्वदेशी महासंघाद्वारे आलेली एक सुवर्ण संधी आहे. यामुळे मोठी क्रांती घडू शकते. परंतु शेतकऱ्यांनी शेती ठेक्याने देऊन आळशी बनू नये, तर स्वत: महासंघाशी जुळून शेतीत राबावे व आपली उन्नती करावी, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन रत्नाकर हजारे यांनी केले. तर आभार सुरेश लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नामदेव डाहूले, राजु चिलमंतलवार, शेषराव धाबेकर, वासुदेव येरगुडे, राजकुमार रामटेके, रविंद्र थेरे, आशिष मोहुलेॅ श्रीकांत लोडे यांनी सहकार्य केले यावेळी राजुरा, बल्लारशा, गोंडपिंपरी, जिवती, कोरपना तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)