शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:49 IST

तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. मात्र, शेतमालाला हमीभाव न देणे, बाजार समितीमध्ये अडत वसूल करणे, आदी कारणांमुळे व्यापाऱ्यांचे चांगभले होत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उमटत आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : अडत वसुलीने तालुक्यातील शेतकरी त्रस्त

मनोज गोरे।आॅनलाईन लोकमतकोरपना : तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. मात्र, शेतमालाला हमीभाव न देणे, बाजार समितीमध्ये अडत वसूल करणे, आदी कारणांमुळे व्यापाऱ्यांचे चांगभले होत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उमटत आहे.यंदा कमी पाऊस पडल्याने उत्पन्नात मोठी घट झाली. अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. पिकविलेला शेतमाल अधिकृत खरेदी केंद्रात विक्री करताना अडचणी येत आहे. २००३ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात आली. गडचांदूर येथे बाजार समितीची उपबाजारपेठ आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व सोयीसुविधा तयार करण्यात आल्या आहेत. मात्र शेतमाल खरेदीसंदर्भात शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याने व्यापारांची मनमानी सुरू झाली आहे.कोरपना परिसरात तीन ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत असली तरी, २४ तासांच्या आत धनादेश मिळत नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. याशिवाय प्रत्येक जिनिंगमध्ये शेतकऱ्यांकडून दोन ते तीन रुपये अडत वसुल केली जात आहे. शासनाने अडत वसुली बंद करुनही हा प्रकाश अनेक ठिकाणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. अल्प पाऊस व बोंड अळीमुळे शेतकºयांचे नुकसान झाले. लागवडीचा खर्च निघाला नाही. शेतकरी आर्थिक विवेचंनेत आहेत. त्यामुळे बाजारात मंदी आली. गुरांना चारा मिळणे कठिण झाले. समाधानकारक पाऊस न पडल्याने यंदा शेतकऱ्यांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. शेतीची कामे संपली पण आता हाताला काम नाही. शेतमाल विकूनही पुरेसे पैसे हाती आले नाही.युवकांमध्ये नाराजीतालुक्यातील जनता प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. शेतकरी कुटुंबातील नवी पिढी शिक्षण घेत आहे. परंतु शेतीच्या आधारावर प्रपंच आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविणे कठीण होत आहे. शासनाने नोकरभरती बंद केली. तर दुसरीकडे तालुक्यातील उद्योगांवर अवकळा आली आहे. शेतीशिवाय अन्य कोणताही रोजगार तालुक्यात उपलब्ध नाही. शिक्षण घेतलेले युवक हतबल झाले आहेत. रोजगार मिळणे कठीण झाल्याने सरकारविरुद्ध रोष व्यक्त होत आहे.आधारभूत किंमतीकडे कानाडोळाशेतमाल विक्रीसाठी शासनाने आधारभूत किंमत जाहीर केली. शेतकऱ्यांची आर्थिक लुट होऊ नये व शेतमाला रास्तभाव मिळावा, हा या योजनेचा हेतू आहे. मात्र, आधारभूत कि मतीची अंमलबजावणी केली जात नाही, असा आरोप तालुक्यातील शेतकरी करीत आहे.