शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शंकरपटाच्या बंदीबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

By admin | Updated: January 17, 2015 02:09 IST

ग्रामीण भागात शंकरपटाची परंपरा कायम होती. परंतु मागील दोन वर्षांपासून शंकरपटावर बंदी आली आणि शंकरपटाच्या शौकिनांमध्ये नाराजीचा सूर उमटला.

नवरगाव : ग्रामीण भागात शंकरपटाची परंपरा कायम होती. परंतु मागील दोन वर्षांपासून शंकरपटावर बंदी आली आणि शंकरपटाच्या शौकिनांमध्ये नाराजीचा सूर उमटला. २०१४ मध्ये पटाला मान्यता मिळाली असली तरी २०१५ मध्ये पुन्हा शंकरपट अडचणीत सापडले आहेत.नवरगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर बैलांचे शंकरपट भरविले जात होते. त्याची ख्याती पंचक्रोशीत होती. शेतीची कामे झाली की शेतकरी विरंगुळा म्हणून जानेवारीपासून ग्रामीण भागामध्ये शंकरपटाला सुरूवात करायचे. जानेवारीपासून ते मे-जूनपर्यंत गावागावांत शंकरपट भरायचे. शेतकरी त्या दृष्टीने बैलजोड्या तयार करून त्यांच्या खाण्याची विशेष व्यवस्था करायचे. एक-दोन महिन्यात बैल धष्टपुष्ट झाल्यानंतर शंकरपटात बैलाच्या शर्यती लावायचे. जिंकणाऱ्या बैलजोडीला विशेष बक्षिसे दिली जात. ज्या शेतकऱ्यांची जोडी जिंकली त्याच्याकडे पाहण्याचा इतर शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलून जायचा याच प्रतिष्ठेपोटी शेतकरी आपल्या घरी पाच-दहा बैलजोड्या ठेवायचे व परिसरात होणाऱ्या शंकरपटात बैलजोड्या हाकायचे.या परिसरात देलनवाडी, रत्नापूर, मिनघरी, वासेरा, शिवणी, कुक्कुडहेटी, डोंगरगाव, वाढोणा व इतर परिसरात दोन ते चार दिवसांचे शंकरपट भरायचे. पट पाहण्यासाठी बैलगाड्या सजवून तर संपूर्ण पट चांगला दिसावा यासाठी तणसाचे भट्टे भरून न्यायचे. त्यावर बसून शंकरपटाचा आनंद लुटायचे. यासोबतच प्रत्येक गावात नाटक, तमाशा, गोंधळ आदी मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे. त्यामुळे रात्रभर शेतकऱ्यांसह नागरिकांना यातून मनोरंजनाची संधी उपलब्ध व्हायची. शंकरपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी परिसरामध्ये नाटकांची मोठी मागणी आहे. काही भागात व्यावसायिक नाटके सुरू झाली असून या नाटकांना रसिकांची चांगलीच गर्दी होत आहे. क्रांतिनायक, चिंधीबाजार, निजला का राजहंस माझा, अहंकार, गीता गाती ज्ञानेश्वर, जय जय गौरीशंकर, अरे माणसा माणसा, रमाई, अंकुर, निराधार हा पुत्र धरतीचा, कसोटी कुंकवाची, आई तुझं लेकरू अशा अनेक नाटकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मनोरंजन होणार असले तरी शंकरटापासून यावर्षी मात्र पटप्रेमींना मुकावे लागणार आहे.याबाबत पोलिसांशी संपर्क केला असता शंकरपटावर बंदी असून याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील. आतापर्यंत कुणालाही शंकरपटाची मंजुरी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)शंकरपट आहे सांस्कृतिक ओळखकाही शेतकऱ्यांच्या बैलजोड्या इतक्या प्रसिद्ध होत असत की त्यांच्या बैलजोडीसोबत शर्यत लावण्यास इतर शेतकरी धजत नव्हते. परिसरातील रत्नापूर येथील काशिनाथ गहाणे, नवरगाव येथील आडकू गहाणे, धर्मा पा. बोरकर, विठोबा घुगूस्कर, देलनवाडी येथील सांबाजी लांजेवार, दादा पा. बोरकर, मसाजी डोंगरवार, नवरगाव येथील सोमाजी चनबनवार, वासेरा येथील आडकु बोरकर, अंतरगाव येथील नामा ठिकरे, रत्नापूर येथील अर्जुन लोधे हे शेतकरी हजारो रुपयांच्या बैलजोड्या केवळ पटासाठी बारमाही पोसायचे. नवरगाव येथील नीळकंठ हरबाजी निनावे यांनी स्वत:च्या शेतीची जागा देलनवाडी या प्रसिद्ध शंकरपटासाठी दान केली. पटामध्ये धावणाऱ्या बैलांच्या हालचालीवरून त्यांचा चेंडू, खराडी, चंद्रया, राज्या, वाघ्या, कुबड्या अशा वेगवेगळ्या नावाने उल्लेख केला जायचा.