शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलवर शेतकऱ्यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 00:33 IST

पिढ्यान्पिढ्या शेती कसत असूनही वनविभाग शेतकऱ्यांना दमदाटी करून नाहक त्रास देत आहे. वनविभागाची ही दंडेली थांबवा,...

मागणी : वनविभागाची दंडेली थांबवानागभीड : पिढ्यान्पिढ्या शेती कसत असूनही वनविभाग शेतकऱ्यांना दमदाटी करून नाहक त्रास देत आहे. वनविभागाची ही दंडेली थांबवा, यासाठी तालुक्यातील बोंड येथील जवळपास ७० शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदारांना साकडे घातले.बोंड येथील जवळपास ७० ते ८० शेतकरी २००५ व त्या अगोदरपासून वन्यप्राप्त जागेत अतिक्रमण करून वहिवाट करीत आहेत. या अतिक्रमित जमिनीस ग्राम वनहक्क समिती बोंड यांच्याकडून मान्यता मिळावी, यासाठी ग्रामसभेच्या ठरावासह वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविण्यात आला. परंतु यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.आता हंगाम सुरू होताच या शेतकऱ्यांनी या जमिनीवर पेरणीचे काम सुरू करताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना पेरणी करण्यास मज्जाव केला. या सर्व शेतकऱ्यांनी १८ जून रोजी बोंड येथील ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेतली. यानंतर बुधवारी सर्व शेतकऱ्यांनी येथील तहसील कार्यालयावर धडक देवून वनविभागाची दंडेली थांबविण्याची मागणी केली. लोकांची मागणी लक्षात घेऊन तहसीलदार समीर माने, तळोधीच्या वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा रामटेके यांना चर्चेसाठी बोलावून चर्चा केली असता ३१ लोकांचे अतिक्रमण अनधिकृत असून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले. दरम्यान आमचे अतिक्रमण अधिकृत करण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी आमरण उपोषण करणार, असे शेतकऱ्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)