शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी व शेतमजुरांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:56 IST

उपविभागीय कार्यालय अंतर्गत येत असलेल्या चिमूर व सिंदेवाही तालुक्यातील शेतमजूर, शेतकरी व जबरानजोत धारकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा तालुका चिमूरच्या वतीने चिमुर उपविभागीय कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य किसान सभा : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : उपविभागीय कार्यालय अंतर्गत येत असलेल्या चिमूर व सिंदेवाही तालुक्यातील शेतमजूर, शेतकरी व जबरानजोत धारकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा तालुका चिमूरच्या वतीने चिमुर उपविभागीय कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारीमार्फंत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.दिवसेंदिवस शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत. उद्योगपतीना एन. पी. एच्या नावाखाली प्रचंड कर्जमुक्ती दिली जात आहे. मात्र शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती नाकारण्यात आली. शेतकºयांच्या पीकाला योग्य हमीभाव देण्यात यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस लागू करण्यात यावी,.जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व जबरानज्योत धारकांवर लावण्यात आलेल्या तीन पिढयांची जाचक अट रद्द करावी, जबरानजोत धारकांच्या जमिनीचे व घराचे पट्टे त्वरीत वाटप करावे, ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागीर व असंघटीत कामगारांना पाच हजार रुपये पेंशन देण्यात यावे, सरसकट कर्जमाफी करून सातबार कोरा करावा, फेटाळलेल्या दाव्यांची फेरचौकशी करावी, प्रत्येक गावाचे जंगलवरील सामूहिक वनहक्काचे दावे मंजूर करावे, शेतमालाला उत्पादनाच्या दीडपट हमीभाव द्यावा, शहरातील अतिक्रमीत झोपडपट्टी धारकांना पट्टे देण्यात यावे, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा चिमूरच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी पार पडलेल्या किसान सभेचे राष्ट्रीय सदस्य डॉ. महेश कोपुलवार, राज्य उपाध्यक्ष प्रा. नामदेव कन्नाके, अरूण वनकर, जिल्हा सचिव राजू गैनवार, नारायण जांभुळे यांनी संबोधित केले. त्यानंतर कॉ. विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. यावेळी नामदेव नखाते, महेंद्र भिमटे, श्रीधर वाढई, संतोष दास, ममता भिमटे, उज्ज्वला बावणकर, मोरेश्वर डांगे, प्रकाश नागपुरे यांच्यासह परिसरातील शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.