शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘आत्मा’ अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण

By admin | Updated: September 25, 2014 23:22 IST

कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेअंतर्गत ‘धान पीक लागवड व तंत्रज्ञान’ या विषयावर येथील कृषी विज्ञान केंद्रात सोमवारी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

सिंदेवाही : कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेअंतर्गत ‘धान पीक लागवड व तंत्रज्ञान’ या विषयावर येथील कृषी विज्ञान केंद्रात सोमवारी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी आर.एन. पठाण होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. डी.व्ही. दुर्गे, तसेच तज्ज्ञ म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक एस.एन. पोतकिले, डॉ.एच. आर. सवई, डॉ.एम.व्ही. तोटावार, तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक एच.एस. होले उपस्थित होते. प्रास्ताविक आर.एन. पठाण यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश तसेच कृषी विभागातील विविध योजना याविषयी उपस्थिताना सांगितले. तद्नंतर कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. डी.व्ही. दुर्गे यांनी बिजोत्पादन याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. एस.एन. पोतकिले यांनी धान पीक लागवड व तंत्रज्ञान तसेच श्री पद्धतीने धान लागवड तंत्रज्ञान याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ.एच.आर. सवई यांनी किडीचे व्यवस्थापन व मित्र किड संवर्धन याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ.एम.व्ही. तोटावार यांनी धान पिकावरील रोगाविषयी माहिती व व्यवस्थापन या विषयी मार्गदशन केले. प्रगतशिल शेतकरी तथा भेंडाळा येथील शेतकरी मित्र श्यामसुंदर गोपाळा बन्सोड यांंनी नियोजन पद्धतीने धान लागवड करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा तसेच स्वत:च्या नियोजन पद्धतीने शेतीतील अनुभव उपस्थित शेतकऱ्यांसमोर कथन केले. या शिबिराचा शेतकऱ्यांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.संचालन ए.टी. मालखेडे कृषी सहाय्यक खांडला यांनी तर आभार जे.एम. पवार मंडळ कृषी अधिकारी नवरगाव यांनी केले. सदर कार्यक्रमाला सिंदेवाहीचे कृषी पर्यवेक्षक जे.जी. भिसे, कृषी सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक जे.पी. झोडे, संघर्ष भडके, मरेगावच्या कृषी सहाय्यक दिपीका बोंकुलवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता विशेष परिश्रम घेतले. या शिबिरात सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)