शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 17:24 IST

Chandrapur News, Tiger राजुरा वनपरिक्षेत्रातील खांबाडा नियत क्षेत्रात धुमाकुळ घालणाऱ्या वाघाच्या हल्ल्यात सोमवारी पुन्हा एका शेतकऱ्याचा बळी गेला.

ठळक मुद्देआतापर्यंत दहा जणांचा बळीहल्लेखोर वाघाला जेरबंद न केल्याने वन विभागाविरूद्ध संताप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा वनपरिक्षेत्रातील खांबाडा नियत क्षेत्रात धुमाकुळ घालणाऱ्या वाघाच्या हल्ल्यात सोमवारी पुन्हा एका शेतकऱ्याचा बळी गेला. मृतकाचे नाव मारोती पेंदोर असे आहे. आतापर्यंत दहा लोकांचा बळी जावूनही हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला अपयश आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.खांबाडा येथील मारोती पेंदोर यांची गावाला लागूनच शेती आहे. सोमवारी दुपारी शेतीच्या जवळच असलेल्या कक्ष क्रमांक १७८ मध्ये पाळीव जनावरांना चराईसाठी नेले होते. परंतु सायंकाळी घरी परत आले नाही. त्यामुळे चिंताग्रस्त कुटुंबाने गावकऱ्यांच्या मदतीने जंगलात शोधशोध सुरू केली असता वाघाच्या हल्ल्यात मारोती पेंदोर यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.

वाघाने हल्ला केल्यानंतर त्यांच्या शरीराचा सुमारे ६० टक्के भाग खाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर राजुऱ्याचे वन परिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांच्या नेतृत्वातील पथकाने पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. तपासणीनंतर कुटुंबीयांना मृतदेह सुपुर्द करण्यात आला. ऐन शेतीच्या हंगामात अशा घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.हल्लेखोर वाघाचा चार महिन्यांपासून धुमाकूळराजुरा व विरूर वनपरिक्षेत्र हल्लेखोर वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. या कालावधीत वाघाने नऊ जणांचा बळी घेतला. सोमवारी खांबाडा येथील मारोती पेंदोर या शेतकऱ्याला ठार केल्याने परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शेतीची जागली सोडल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.राजुरा व विरूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांवर वाघाचा हल्ला झाल्याची माहिती वरिष्ठांना अहवालाद्वारे देण्यात आली आहे. हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप यश आले नाही. त्यामुळे नागरिकांनी शेतीची कामे करताना काळजी घेतली पाहिजे.-विदेशकुमार गलगट, वनपरिक्षेत्र अधिकारी, राजुरा

टॅग्स :Tigerवाघ