शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

रंगीबेरंगी साड्यांनी नटले शेतशिवार; वन्यप्राण्यांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 11:06 IST

राजुरा तालु्क्यातील काही शेतकऱ्यांनी नवी युक्ती शोधली असून शेतीला चक्क साड्यांचे कुंपण करून पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

ठळक मुद्देपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वातावरणात सातत्याने होणारे बदल, तापमानाचा घसरत जाणारा पारा आणि गडद धुके हे सर्व असतानाच वन्यप्राण्यांपासून शेताची होणारी नासधूस यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे शेतातील पीक वाचविण्यासाठी विविध प्रयोग करीत आहेत. असाच प्रयोग जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी केला असून रंगीबेरंगी साड्यांनी शेतशिवार सजवले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची पीक वाचविण्याची धडपड बघायला मिळत आहे.महिनाभरापासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधीअवकाळी पाऊस तर कधी ढगाळी वातावरण यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. त्यातच औषध फवारणीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अडचणीत आणखीनच भर पडली आहे. कापूस, सोयाबिन, हरभरा उत्पादक ढगाळ वातावरणामुळे चिंतेत सापडले आहेत. मागील काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती असल्याने जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यातच चार दिवसापूर्वी पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे धुक्याची दाट चादर पसरत आहे. हे सर्व संकट असतानाच वन्यप्राण्यांमुळेही शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने जिल्ह्यातील राजुरा तालु्क्यातील काही शेतकऱ्यांनी नवी युक्ती शोधली असून हरभरा तसेच गहु पिकाच्या संरक्षमासाठी शेतीला चक्क साड्यांचे कुंपण करून पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

वातावरण बदलाचा शेतकऱ्यांना फटकायंदा पर्जन्यमान समाधानकारक असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हरभरा, गहू या पिकांचे लागवड केली. मात्र वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि वातावरणातील बदलामुळे ते त्रस्त झाले आहे. शेतकरी शेती जगविण्यासाठी फवारणीसाठी मोठा खर्च करीत आहेत. सातत्याने वातावरणात बदल होत असला तरी मोठ्या मेहनतीने यंदा औषध फवारणी करुन पिके जगविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, हवामान खात्याने आणखी काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की, काय अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

टॅग्स :agricultureशेती