शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

नांदा येथील रास्तभाव दुकान कायमचे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST

कोरपना : कोरपना तालुक्यातील नांदा येथील रास्तभाव दुकानदाराकडून मागील सहा वर्षापासून सातत्याने शिधापत्रिकाधारकांची लुट करुन काळाबाजारी केली जात ...

कोरपना : कोरपना तालुक्यातील नांदा येथील रास्तभाव दुकानदाराकडून मागील सहा वर्षापासून सातत्याने शिधापत्रिकाधारकांची लुट करुन काळाबाजारी केली जात होती. २०१५ व २०१७ मध्ये दोनदा रास्तभाव दुकान रद्द करण्यात आले होते. मात्र जिल्हा पुरवठा विभागाने दंड वसूल करुन अनेकदा संधी दिल्यानंतरही काळाबाजारी करणे बंद न केल्याने नांदा येथील रास्तभाव दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेन्द्र दांडेकर यांनी कायम स्वरुपी रद्द केला आहे.

किसन गोंडे नामक स्वस्त धान्य दुकानदाराकडे नांदा येथील दुकान होते. डिसेंबर २०१४ मध्ये अन्नसुरक्षा कायदा अमलात आला. शिधापत्रिकाधारकांना लाभ देण्याऐवजी नांदा व नांदाफाटा येथील रास्तभाव दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांची मोठी आर्थिक लूट केली. २०१५ मध्ये चौकशीअंती येथील रास्तभाव दुकान जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी रद्द केले होते. रास्तभाव दुकानदारने विभागीय आयुक्तांकडे अपील करुन उपजीविकेकरिता रास्तभाव दुकानाशिवाय इतर व्यवसाय नसल्याने पुन्हा चुका करणार नसल्याचे हमीपत्र लिहून दिल्याने शासनाने परत रास्तभाव दुकान बहाल केले. संधीचा सदुपयोग करण्याऐवजी सातत्याने लुट सुरुच ठेवली. जिल्हा पुरवठा विभागाने आर्थिक दंड लावूनही सुधारणा होत नसल्याने २०१७ मध्ये किसन गोंडे यांचा परवाना रद्द केला. आणखी दुकान परत आणण्यात गोंडे यशस्वी झाले.

अपंग व्यक्तीला धान्य न देणे, मुलगा व सुन दोघेही जिल्हापरीषद शिक्षक असताना त्यांच्या नावाने धान्य उचलणे, आगाऊचे पैसे घेणे, काळाबाजारी करणे किसन गोंडे यांनी सुरुच ठेवल्याने उशीरा का होईना जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी नांदा येथील रास्तभाव दुकान रद्द करुन किसन गोंडे यांना चांगलाच दणका दिला आहे. नांदा येथील रास्तभाव दुकान महिला बचत गटाला देऊन काळाबाजारी करणार्‍याची मक्तेदारी कायमची संपविण्याची मागणी महिलांनी केली आहे.