शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वीज दरवाढी विरोधात धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 00:45 IST

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या वतीने स्थानिक नगपालिका बचत भवन समोरील प्रांगणात वीज वितरण कंपनीने वीज देयकात भरमसाठ वाढ केली.

सरकारविरोधी घोषणा : वीज दरवाढ मागे घेण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर: बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या वतीने स्थानिक नगपालिका बचत भवन समोरील प्रांगणात वीज वितरण कंपनीने वीज देयकात भरमसाठ वाढ केली. वीज दरवाढ मागे घेण्याची मागणी करीत शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आहे. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.घरगुती वीज ग्राहकांना पूर्वी एका महिन्यांचे बील ४०० ते ५०० रूपये येत होते. मात्र एप्रिल महिन्यांपासून वीज देयक १२०० रूपये येत असल्याने वीज ग्राहकाचे कंबरडे मोडले आहे. या प्रकारमुळे वीज ग्राहकांत संताप व्यक्त केला जात आहे. राज्यातील सरकार सर्वसामान्य नागरिकांची लुटमार करीत असल्याचा गंभीर आरोप बीआरएसपीचे प्रदेश महासचिव राजू झोडे यांनी केला. वीज दरवाढ मागे घेण्यात आली नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.शहरातील बहुतेक वॉर्डात अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे तयार करण्यात आले. यावर कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले. मात्र अल्पावधीतच ठिकठिकाणच्या रस्त्याचे बांधकाम करताना निकृष्ट सहित्याचा वापर करून भ्रष्टाचाराला चालना देण्यात आणण्याचा आरोपही बिआरएसपीच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलनादरम्यान केला. तसेच सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.शहरात जीवन प्राधिकरणाच्या माध्यामातून नळयोजनेतून पाणी पुरवठा केला जातो. येथे पिण्याच्या पाण्याच्या बिलातही अन्य शहराच्या तुलनेत अधिकचा दर आकारला जात आहे. परिणामी नागरिक वीज व पाणी बिलामुळे त्रस्त झाले आहेत. सदरची दरवाढ महागाईचा मार सोसणाऱ्या नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारी आहे. नागरिकांवर अन्याय लादण्याचा प्रकार आहे, असे बिआरएसपीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजू झोडे यांनी म्हटले आहे.धरणे आंदोलन राजू झोडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत कोरडे, भास्कर भगत, वंदना तामगाडगे, नितीन साठे, स्नेहल ठाकरे, गीता चौधरी, माया मडावी यांच्यासह बल्लारपूर तालुक्यातील बीआरएसपीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.