शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या तीन तालुक्यांना सुविधा पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:29 IST

यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, पंचायत समिती सभापती रवींद्र धोटे, उपसभापती अनिल झोटे, ...

यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, पंचायत समिती सभापती रवींद्र धोटे, उपसभापती अनिल झोटे, नगरसेवक शेख, बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी बाळू मुंजनकर, वरोरा, भद्रावती, बल्लारपूर व राजुरा येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, आयसोलेशनमधील रुग्णांना भोजनात नॉनव्हेज, अंडी द्यावी. रोज दोन वेळचे भोजन, चहा व नास्ता देण्यात यावा. ग्रामपंचायतींना आयसोलेशनसाठी निधी उपलब्ध करून दिला. त्याचा उपयोग करून तातडीने विलगीकरण कक्ष स्थापन करावे, अशा सूचनाही दिल्या. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण, लससाठा याबाबत आढावा घेतला. बल्लारपूर तालुक्यात २५० आयसोलेशन बेड्स उपलब्ध आहेत. मात्र ऑक्सिजनयुक्त बेड्स नाहीत. त्यासाठी २० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर्स उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या. खासदार बाळू धानोरकर म्हणाले, लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणी केल्याने बाहेर जिल्ह्यातील नागरिक लाभ घेत आहेत. मात्र, मोबाइल नसलेले स्थानिक नागरिक वंचित आहेत. त्यामुळे ऑफलाइन नोंदणी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली. आ. प्रतिभा धानोरकर यांनीही कोविड पेशंट मॅनेजमेंट पोर्टलवर गंभीर रुग्णांना प्राधान्य देण्याची सूचना केली.

राजुरात २०० बेड्स वाढविण्याचा प्रस्ताव

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजुरा येथील कोविड केअर सेंटरची पाहणी केली. राजुरा उपविभागीय कार्यालयात राजुरा, जिवती व कोरपणा तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. राजुरा विभागात सध्या ४० ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. २०० बेड्स वाढविण्याचा प्रस्ताव प्रस्तावित असून, येत्या काही दिवसांत कार्यान्वित होईल. दरम्यान, ऑक्सिजन पुरवठा वाढवून देण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी केली.

वन अकादमीची पाहणी

वन अकादमीमध्ये प्रस्तावित वाढीव ऑक्सिजन बेड्स निर्मितीची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, साहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर उपस्थित होते.