शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या चार तालुक्यांना सुविधा पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 05:00 IST

बल्लारपूर तालुक्यात २५० आयसोलेशन बेड्स उपलब्ध आहेत. मात्र ऑक्सिजनयुक्त बेड नाही. त्यासाठी २० जम्बो ऑक्सिजन सिलिंड उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या. खासदार बाळू धानोरकर म्हणाले, लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाईन नोंदणी केल्याने बाहेर जिल्ह्यातील नागरिक लाभ घेत आहेत. मात्र, मोबाईल नसलेले स्थानिक नागरिक वंचित आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : बल्लारपूरला मिळणार २० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरा, भद्रावती, राजुरा व बल्लारपूर तालुक्यातील रूग्णांना तातडीने आरोग्य सुविधा पुरविण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. शुक्रवारी या तीनही तालुक्यातील कोविड केअर सेंटरची पाहणी आढावा बैठकीत ते बोलत   होते.यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, पंचायत समिती सभापती रवींद्र धोटे, उपसभापती अनिल झोटे, नगरसेवक शेख, बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी बाळू मुंजनकर, वरोरा, भद्रावती, बल्लारपूर व राजुरा येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, आयसोलेशनमधील रूग्णांना भोजनात नॉनव्हेज, अंडे द्यावे. रोज दोन वेळचे भोजन, चहा व नाश्ता देण्यात यावे. ग्रामपंचायतींना आयसोलेशनसाठी निधी उपलब्ध दिला. त्याचा उपयोग करून तातडीने विलगीकरण कक्ष स्थापन करावे, अशा सूचनाही दिल्या. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण, लससाठा याबाबत आढावा घेतला. बल्लारपूर तालुक्यात २५० आयसोलेशन बेड्स उपलब्ध आहेत. मात्र ऑक्सिजनयुक्त बेड नाही. त्यासाठी २० जम्बो ऑक्सिजन सिलिंड उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या. खासदार बाळू धानोरकर म्हणाले, लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाईन नोंदणी केल्याने बाहेर जिल्ह्यातील नागरिक लाभ घेत आहेत. मात्र, मोबाईल नसलेले स्थानिक नागरिक वंचित आहेत. त्यामुळे ऑफलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली. आ. प्रतिभा धानोरकर यांनीही कोविड पेशंट मॅनेजमेंट पोर्टलवर गंभीर रूग्णांना प्राधान्य देण्याची सूचना केली. 

राजुरात २०० बेड्स वाढविण्याचा प्रस्तावपालकमंत्र विजय वडेट्टीवार यांनी राजुरा येथील कोविड केअर सेंटरची पाहणी केली. राजुरा उपविभागीय कार्यालयात राजुरा, जिवती व कोरपणा तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. राजुरा विभागात सध्या ४० ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. २०० बेड वाढविण्याचा प्रस्तावित असून येत्या काही दिवसात कार्यान्वित होईल. दरम्यान, ऑक्सिजन पुरवठा वाढवून देण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी केली. 

वन अकादमीची पाहणीवन अकादमीमध्ये प्रस्तावित वाढीव ऑक्सिजन बेड निर्मितीची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर उपस्थित होते. 

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcorona virusकोरोना वायरस बातम्या