शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

लढाऊ वृत्तीने आपल्यासमोरील आव्हानांचा सामना करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:11 IST

दिवसेंदिवस समाज बांधवापुढे अनेक आव्हाने येत आहेत. या आव्हानाला न डगमगता लढाऊ वृत्तीने समाजासमोरील आव्हानांचा मुकाबला करावा,

ठळक मुद्देसुशील कोहाड : रक्त स्वाक्षरी व रक्तदान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिवसेंदिवस समाज बांधवापुढे अनेक आव्हाने येत आहेत. या आव्हानाला न डगमगता लढाऊ वृत्तीने समाजासमोरील आव्हानांचा मुकाबला करावा, असे प्रतिपादन आदिवासी संशोधक डॉ. सुशील कोहाड यांनी केले.राष्ट्रीय आदिम कृती समिती, चंद्रपूरच्यावतीने रविवारी महाराष्ट्र शासनाच्या अन्यायकारक आदिवासी धोरणाच्या निषेर्धात रक्त स्वाक्षरी व रक्तदान कार्यक्रम शिवाजी चौक, चंद्रपूर येथे पार पडला. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीला चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून आदिवासी हलबा समाज बांधवांनी उत्स्फुर्तपणे वॉर्डावॉर्डातून रॅली काढून शिवाजी चौक चंद्रपूर या कार्यक्रमस्थळी एकत्र येऊन कार्यक्रमात सहभाग नोंदविला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँक आॅफ इंडियाचे माजी सहायक महाव्यवस्थापक बाळकृष्ण सोरते, तर प्रमुख पाहुणे म्हणुन अ‍ॅड. नंदा पराते, योगेश गोन्नाडे, संजय हेडाऊ, गजाननराव सोरते, (वर्धा) उदय धकाते (गडचिरोली), प्रा. डॉ. विजय सोरते, (बल्लारपूर) उपस्थित होते.यावेळी कोहाड पुढे म्हणाले, सुप्रिम कोर्टाच्या ६ जुलै २०१७ च्या निर्णयाचा उल्लेख करत त्यांनी सर्व समाज बांधवांनी एकजुटीने न्यायालयीन तसेच रस्त्यावरची लढाई करण्यावर भर दिला. तसेच हलबा समाजाच्या गौरवशाली भुतकाळाबद्दल माहिती दिली. तर योगेश गोन्नाडे मार्गदर्शन करताना म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या २००१ च्या जाती कायद्यातील तरतुदींचे विवेचन करून जात कायदा कसा घटनाबाह्य आहे. याबाबत दाखले देऊन समाजावून सांगितले. तसेच समाज बांधवांनी न घाबरता एक जुटीने लढणयाचे आव्हान केले. स्थानिक जेष्ठ कार्यकर्ते जगन्नाथ पेकडे, विकास निपाणे, अभिजीत दलाल आणि ललिता बेहरम, कुंभारे आरमोरी यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी पार पडलेलया रक्तस्वाक्षरी अभियानात दोन हजारांवर हलबा आदिवासींनी स्वत:च्या नावे स्वाक्षरी करून रक्ताचे ठसे उमटविले. तर यावेळी ६१ आदिवासींनी रक्तदान केले.संचालन प्रा. ईशान नंदनवार, विलास निपाने, प्रास्ताविक पुुंडलिक नंदुरकर यांनी तर आभार सरिता सोनकुसरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोहर धकाते, पूंडलिक नंदूरकर, राजू नंदनवार, मधुकर कुंभारे, रेखा बल्लारपुरे, आदिम युवा सेना, आदिम कर्मचारी सेनेचे पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.