शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अड्याळ टेकडीचा चेहरामोहरा बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:25 IST

शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थेच्या पुढाकाराने भूवैकुंठ अड्याळ टेकडीवर नवीन बांधकामे झाली आहेत. त्यामुळे टेकडीचा चेहरामोहरा बदलला आहे. सेवाकार्याची प्रेरणा घेण्याकरिता शेकडो नागरिक दर्शनाकरिता येतात.

ठळक मुद्देवारसा नागभीड तालुक्याचा

नागभीड : शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थेच्या पुढाकाराने भूवैकुंठ अड्याळ टेकडीवर नवीन बांधकामे झाली आहेत. त्यामुळे टेकडीचा चेहरामोहरा बदलला आहे. सेवाकार्याची प्रेरणा घेण्याकरिता शेकडो नागरिक दर्शनाकरिता येतात.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने गीताचार्य तुकारामदादा यांनी आपल्या साधनेसाठी अड्याळ टेकडीची निवड केली. टेकडीवर त्यांनी अखंड १२ वर्षे मौन धारण करून साधना केली. त्यानंतर ते लोकसेवेसाठी बाहेर निघाले. संबंध महाराष्ट्र व देशात दादाच्या समाजसेवेचे कार्य सुरू असताना अड्याळ टेकडीवर त्यांनी विशेष लक्ष पुरविले. टेकडीवर त्यांनी स्वत:च्या कल्पनेतील सार्वभौम असे एक गाव निर्माण केले. त्याचबरोबर अड्याळ टेकडीच्या पंचक्रोशीत असलेल्या खेड्यांना स्वावलंबनाची दीक्षा देण्याचे कार्यही अविरत केले. अशा महान आणि आदर्श समाजसेवकाचे ८ जून २००६ रोजी निधन झाले. अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजर झाले. अशाच मान्यवरांपैकी शेगावच्या गजानन महाराज ट्रस्टचे शिवशंकर पाटील उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत शिवशंकर पाटील यांनी गीताचार्य तुकारामदादा आणि आपल्यात काय नाते होते, हे सांगून ज्या ठिकाणी दादांना चिरशांती देण्यात आली त्या ठिकाणी दादाच्या समाधी स्थळासाठी शेगाव संस्थेने दोन कोटी रूपये खर्च करणार असल्याची ग्वाही दिली.शिवशंकर पाटील यांच्या ग्वाहीनुसार दादाच्या समाधीस्थळांचे बांधकाम हाती घेण्यात आले. हे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. समाधीस्थळांचे संपूर्ण बांधकाम राजस्थानी पद्धतीचे असून बांधकामासाठी लागणारा दगड आणि कारागीर राजस्थानातूनच मागविण्यात आले होते. या समाधी स्थळाव्यतिरिक्त आणखी इतर विविध बांधकामे करण्यात आली. समाधीस्थळाच्या पूर्वेला विशाल जलाशय, पुष्पवेली आणि विविध प्रजातीच्या वृक्षांनी बहरलेली अड्याळ टेकडी आता सेवास्थळ झाली आहे. टेकडीवरी विलोभनीय बांधकामाने सौंदर्यात भर टाकली. गीताचार्य तुकारामदादा ज्या ठिकाणी बसून गुरुदेव भक्तांना मार्गदर्शन करीत तिथे सभागृह बांधण्यात आले. आणखी लहान-मोठी अनेक कामे करण्यात आली आहे. या कामाने अड्याळ टेकडीचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. अड्याळ टेकडीवर सुरू असलेले विविध उपक्रम ग्रामीण विकासाला चालना देणारी आहेत.गीताचार्य तुकाराम दादानी राष्ट्रसंताच्या प्रेरणेतून शेकडो विधायक कामे केली. सामान्यांच्या हितासाठी झटले. ग्रामगीतेतील विचार आचरणात आणला. लोकांचे प्रबोधन करून चांगल्या मार्गाला लावले.-घनश्याम नवघडे