शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:44 IST

केंद्रातील आणि राज्यातील भाजपाच्या नेतृत्वातील सरकारने अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आली असून, प्रगतीपथावर आहेत.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : विचारमंथन बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रातील आणि राज्यातील भाजपाच्या नेतृत्वातील सरकारने अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आली असून, प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. सरकारचे लोककल्याणकारी निर्णय, कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावे, तसेच भाजपाचे संघटन अधिक बळकट करावे, असे आवाहन अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपुरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात भाजपा पक्षाची जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. संजय धोटे, आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, नगरसेवक राहुल पावडे, हिरामण खोब्रागडे, रामपाल सिंह, अनील फुलझेले, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना अर्थमंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांसाठी, ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आपण उपलब्ध केला आहे. स्वच्छता मोहिमेत जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्तम करण्याच्या दृष्टीने आपण योजना आखली आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्या आयएसओ करण्याचे काम सुरू आहे. ही सर्व विकास प्रक्रिया जनतेपर्यंत पोहोचवत जनता तसेच भाजपा यातील सुसंवाद अधिक प्रशस्त करावा. कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पाटीर्ची प्रतिमा जनमानसात अधिक ओजस्वी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. .यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, तीन राज्यात भाजपा सत्तेत येऊ शकली नाही. काही जागा कमी मिळाल्या असल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणारी लोकसभेची निवडणूक जिंकत भारतीय जनता पार्टी पुन्हा आपले वर्चस्व सिध्द करेल, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.यावेळी अनेकांनी मार्गदर्शन केले. भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस आशिष देवतळे यांनी सी.एम. चषक स्पर्धेचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला. कार्यक्रमाचे संचालन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय गजपूरे यांनी केले.यावेळी भद्रावती तसेच ब्रह्मपुरी नगर परिषद निवडणुकीत निर्वाचित झालेल्या भाजपा सदस्यांचा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.