शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिसवरील खर्च ६ लाख शासनाची मदत केवळ दीड लाखांची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली. पण, उपचारादरम्यान स्टेराईडचा अति वापर झालेल्या व काही अनियंत्रित मधुमेही रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार होत आहे. चंद्रपुरात बुधवारी  अशा ५२ रुग्णांची नोंद जिल्हा आरोग्य प्रशासनाने घेतली. हे रुग्ण शहरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.  म्युकरमायकोसिसवरील  लिपोसोमल एम्पोटीरीसिन-बी सहा इंजेक्शन द्यावे लागतात. एका इंजेक्शनची किमत सात हजार रुपये आहे.

ठळक मुद्देविमा रकम वाढविण्याची गरज : उपचाराचा महागडा खर्च परवडेना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनातून बरे झाल्यानंतर काही रुग्णांना म्युकरमायकोसिस नावाच्या काळी बुरशी आजाराचा सामना करावा लागत आहे. या आजारावरील उपचाराचा खर्च सुमारे ६ लाखांपर्यंत आहे. मात्र,  महात्मा जोतिबा फुले योजनेतून शासनाकडून केवळ दीड लाखांची मदत मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित पैसे कुठून आणायचे, या प्रश्नाने रुग्णांचे कुटुंबीय धास्तावले आहेत.जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली. पण, उपचारादरम्यान स्टेराईडचा अति वापर झालेल्या व काही अनियंत्रित मधुमेही रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार होत आहे. चंद्रपुरात बुधवारी  अशा ५२ रुग्णांची नोंद जिल्हा आरोग्य प्रशासनाने घेतली. हे रुग्ण शहरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.  म्युकरमायकोसिसवरील  लिपोसोमल एम्पोटीरीसिन-बी सहा इंजेक्शन द्यावे लागतात. एका इंजेक्शनची किमत सात हजार रुपये आहे. आता हे इंजेक्शन आरोग्य विभागच खरेदी करीत आहेत. पण, खासगी डॉक्टरांचा उपचाराचा खर्च जास्त  असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली.

रुग्णांच्या नातेवाईकांना पैशाची चिंता

गुरुवारपासून आरोग्य विभागानेच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन पुरविण्याचा निर्णय घेतला. मात्र, पॉसॅकोनाझोल गोळ्यांचाही तुटवडा कायम आहे. शासनाकडून किती मदत मिळेल, याबाबत काही माहिती नाही. - महेंद्र शिंगणे, तुकूम, चंद्रपूर

म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारासाठी सुमारे  चार ते पाच लाखांचा खर्च येतो, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला. सरकार विमा योजनेतून दीड लाखांचा खर्च देणार आहे. मात्र, उर्वरित रकमेची सोय नाही. त्यामुळे कुठून जमवाजमव करायची हा प्रश्न आहे. - सुधाकर राऊत,  समाधी वाॅर्ड, चंद्रपूर 

खासगी रुग्णालयात अतिरिक्त आकारणीम्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे काही डॉक्टर अतिरिक्त शुल्क आकारणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा खर्च वाढतो. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनेच  या आजारावरील इंजेक्शन वितरण करण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालकांनी सोमवारी दिल्या. इंजेक्शनप्रमाणेच उपचाराचे शुल्कही निश्चित करून देण्याची मागणी रुग्णांच्या एका नातेवाईकाने केली आहे.

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या