शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

महाऔष्णिकच्या संच विस्तारीकरणाचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 04:51 IST

महानिर्मिती कंपनीअंतर्गत येणा-या चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील दोन संचाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव राज्याच्या उद्योग ऊर्जा विभागाकडे काही महिन्यांपासून प्रलंबित होता. दरम्यान, राज्यातील विजेची वाढती गरज लक्षात घेवून प्रकल्पात काही सुधारणा सुचविल्यानंतर अंदाजित व अतिरिक्त भाग भांडवलासाठी ऊर्जा विभागाने मान्यता दिल्याने संच विस्तारीकरणाचा तिढा सुटला आहे.

राजेश मडावी चंद्रपूर : महानिर्मिती कंपनीअंतर्गत येणा-या चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील दोन संचाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव राज्याच्या उद्योग ऊर्जा विभागाकडे काही महिन्यांपासून प्रलंबित होता. दरम्यान, राज्यातील विजेची वाढती गरज लक्षात घेवून प्रकल्पात काही सुधारणा सुचविल्यानंतर अंदाजित व अतिरिक्त भाग भांडवलासाठी ऊर्जा विभागाने मान्यता दिल्याने संच विस्तारीकरणाचा तिढा सुटला आहे.राज्याच्या एकूण वीज उत्पादनात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा वाटा सर्वाधिक आहे. उद्योग, वाणिज्यिक व घरगुती वीज वापरण्याचे दरडोई प्रमाण वाढल्याने राज्यात अतिरिक्ति वीज उत्पादनाची दिवसेंदिवस गरज भासत आहे. त्यामुळे या केंद्रातील प्रती ५०० मे. वॅ. क्षमतेच्या आठ आणि नऊ या दोन संचाच्या विस्तारीकरणासाठी उद्योग व ऊर्जा विभागाने राज्य वितरण निर्मिती कंपनीला मंजुरी दिली होती. प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान पुरवठ्यातील फरक, बाजार मूल्यांकनात होणारा बदल, कामासाठी लागणाºया साधसामुग्रीची किंमत व निर्देशांकात झालेली वाढ आणि प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लागणारा विलंब आदी कारणांमुळे खर्चात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे सुधारित खर्च व वाढीव भागभांडवलासाठी मंजुरी देण्याचा प्रश्न शासनाकडे प्रलंबित होता.दरम्यान, १५ मे २०१७ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली होती. मात्र, मंजुरीसंदर्भात विचार झाला नव्हता. परिणामी, मूळ प्रकल्प खर्च, महानिर्मितीच्या प्रस्तावाप्रमाणे सुधारित प्रकल्प खर्च, वाढीव खर्च आणि प्रत्यक्षात व्यापारी तत्त्वावर सुरू होईपर्यंतच्या कालावधीसाठी होणाºया अतिरिक्त सुधारित खर्चाबाबत कामालीचा संभ्रम निर्माण झाला होता.> वीज उत्पादनात अव्वलचंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील आठ व नऊ क्रमांकाच्या संच विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यास राज्यातील विजेची समस्या कायमची दूर होणार आहे. वेकोलिने कोळसा उत्पादन व आयात धोरणात बदल केल्याने राज्यातील काही औष्णिक केंद्राच्या वीज उत्पादनाला मोठा फ टका बसला आहे. तर खासगी वीज उत्पादक कंपन्यांकडून वीज खरेदी करताना दर निश्चितीचा प्रश्न सुटला नाही. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राचे वीज उत्पादन अव्वल ठरले आहे. दोन संचाच्या विस्तारीकरणानंतर वीज उत्पादनात पुन्हा भर पडू शकते.