शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रदर्शनातून महिलांना प्रोत्साहन मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 23:46 IST

महिलांच्या अंगी अनेक कलागुण असतात. त्यांचे कौशल्य जगासमोर येण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वस्तू प्रदर्शन गरजेचे असते.

ठळक मुद्देअंजली घोटेकर : चंद्रपुरात वस्तू प्रदर्शन मेळावा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : महिलांच्या अंगी अनेक कलागुण असतात. त्यांचे कौशल्य जगासमोर येण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वस्तू प्रदर्शन गरजेचे असते. तसेच महिलांनी आपल्या कौशल्यातून तयार केलेल्या वस्तूची विक्री केल्यानंतर त्याचा आर्थिक स्तर उंचावत असतो. असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले.स्थानिक राजीव गांधी सभागृहात इनरव्हिल क्लब आॅफ स्मार्ट सिटीच्या वतीने वस्तू प्रदर्शनी व विक्री मेळावा नुकताच पार पडला. यावेळी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्पना पलिकुंडवार, क्लबच्या अध्यक्ष रमा गर्ग, फाऊंडर अध्यक्ष डॉ. विद्या बांगडे, सचिव नंदा कळस्कर, शफिक अहमद, रोटरीचे जिल्हाध्यक्ष रोडमल गहलोत, क्लबचे सेक्रेटरी जयस्वाल, डॉ. प्रमोद बांगडे, निर्मल गर्ग, डॉ. किरण देशपांडे, किरण खांडरे आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना क्लबच्या अध्यक्ष गर्ग म्हणाल्या, आजची महिला ही प्रत्येक क्षेत्रात पुढे गेली आहे. त्यासाठी त्यांना आवश्यक असा मंच उपलब्ध करुन देण्याची गरज असते. हिच बाब हेरुन क्लबच्या वतीने महिलांसाठी वस्तू प्रदर्शन व विक्री प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. त्यानंतर पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी ५० स्टॉल लावण्यात आले होते. दरम्यान बचत गटातील महिलांनी तसेच दिव्यांग महिलांनी अनेक गृहपयोगी वस्तूचे स्टॉल लाऊन त्यांची विक्री करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन जीनी गर्ग, नियाज कुरेशी तर उपस्थिताचे आभार पूनम कपूर यांनी मानले. यावेळी क्लबच्या शंकुतला गोयल, सुनिता जयस्वाल, चंदा खांडरे, सीमा गर्ग, मिना गुप्ता, नंदा चवरे, अंजूम, प्रतीभा उदापूरे, संगीता त्रिवेदी, मीना अग्रवाल तसेच इनरव्हिल क्लब स्मार्ट सिटीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.