शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

चिनी वस्तूवर बहिष्कार टाका

By admin | Updated: October 29, 2016 00:51 IST

चीन भारताच्या विरोधात पाकिस्तानला सहकार्य करीत आहे. त्यामुळे भारताची चारही बाजूने कोंडी होत आहे.

रघुवीर अहीर : कमल स्पोर्र्टींग कल्बचे आंदोलन चंद्रपूर : चीन भारताच्या विरोधात पाकिस्तानला सहकार्य करीत आहे. त्यामुळे भारताची चारही बाजूने कोंडी होत आहे. पाकिस्तानला शस्त्र, अस्त्र उपलब्ध करुन देत असल्यामुळे आपल्या जवानाचा नाहक बळी जात आहे. मात्र आर्थिक बाजूने चीनच्या उत्पादीत वस्तूचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करीत आहोत. त्यामुळे चीनची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. त्यामुळे आपणाला चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकणे गरजेचे आहे, असे वक्तव्य कमल स्पोर्र्टींग कल्बचे अध्यक्ष रघूवीर अहीर यांनी केले.चिनी वस्तूच्या बहिष्कार आंदोलनालनासाठी काढण्यात आलेल्या रॅलीच्या वेळी ते बोलत होते. कमल स्पोर्र्टींग कल्ब व स्वदेशी जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी गिरणार चौकातून गांधी चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. कमल स्पोर्र्टींग कल्बचे मार्गदर्शक शिवम त्रिवेदी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी रघूवीर अहीर म्हणाले, आज आपण प्रत्येक छोट्या मोठ्या सर्व वस्तंूसाठी चिनी वस्तूचा वापर करीत आहोत. त्या वस्तूचा वापर करणे टाळावे व चिनी वस्तूवर बहीष्कार टाकावा, असे आवाहन केले. यावेळी क्लबचे उपाध्यक्ष सुरज पेंदूलवार म्हणाले, चीन भारताच्या विरोधी पाकिस्तानला सहकार्य करीत आहे. त्यामुळे भारताला पाकिस्तानसोबत प्रत्यक्ष व चीनसोबत अप्रत्यक्ष लढाई करावी लागत आहे. चीनचे सामर्थ्य त्यांच्या व्यापारावर अवंलबून आहे. त्यामूळे चिनी वस्तूवर नागरिकांनी बहिष्कार टाकावा, असे ते म्हणाले. यावेळी मोहन चौधरी यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी कल्बचे अध्यक्ष रघूवीर अहीर, सुरज पेंदूलवार, राहूल गायकवाड, हिमायू अली, प्रज्वल कडू, शिवम त्रिवेदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रज्वल कडू यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिनव लिंगोजवार, जगदीश दंडेले, तेजा सिंग, महेश अहीर, कमल कालीवाले, रवी बनकर, हेमराज काबलिया, जितू शर्मा, मयूर झाडे, विपीन मेंढे, अक्षय खांडेकर, जितेश वासेकर आदींनी प्रयत्न केले. (नगर प्रतिनिधी)