शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनाच्या पथकाकडून होणार स्वच्छतेची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 22:21 IST

देशात सर्व जिल्ह्याचे स्वच्छता विषयक गुणांकण ठरविण्यासाठी ‘स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत १ ते ३१ आॅगष्ट या कालावधीत सर्व्हेक्षण होणार आहे. शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, यात्रा स्थळे तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विविध सार्वजनिक ठिकाणांची यावेळी पाहणी करण्यात येणार आहे. १० ते १६ गावांना प्रत्यक्ष भेटीतून सर्व्हेक्षण होणार असल्याने सर्वच ग्रामपंचायतींनी सज्ज असावे, अशा सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ : शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणांची तपासणी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशात सर्व जिल्ह्याचे स्वच्छता विषयक गुणांकण ठरविण्यासाठी ‘स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत १ ते ३१ आॅगष्ट या कालावधीत सर्व्हेक्षण होणार आहे. शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, यात्रा स्थळे तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विविध सार्वजनिक ठिकाणांची यावेळी पाहणी करण्यात येणार आहे. १० ते १६ गावांना प्रत्यक्ष भेटीतून सर्व्हेक्षण होणार असल्याने सर्वच ग्रामपंचायतींनी सज्ज असावे, अशा सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत.गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणांचे निरिक्षणे तसेच स्वच्छताविषयी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी यांची स्वच्छतेबाबतची मते घेतली जाणार आहेत. स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाच्या संकेत स्थळावरील माहितीचा आधारही यासाठी घेण्यात येणार आहे. सर्वत्र हे सर्व्हेक्षण होणार असून सर्व्हेक्षणासाठी ग्रामपंचायतीची निवड नमुना निवड पध्दतीने सर्व्हेक्षण संस्थेकडून केली जाणार आहे. राज्यातील ३४० ते ५४४ ग्रामपंचायती मधून सर्व्हेक्षाण होणार असून राज्यात ५० लाख ग्रामस्थांकडून प्रत्यक्ष व आॅनलाईन सहभाग घेतला जाणार आहे.गावस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छताग्रही, ग्रामपंचायत सदस्य, निगराणी समिती सदस्य, अंगणवाडी कार्यकर्त्या आशा आणि शिक्षक यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत.स्वच्छता सर्व्हेक्षणाला १०० गुणसार्वजनिक जागेवरील स्वच्छतेचे निरीक्षण : ३० गुण (शौचालय उपलब्धता- ५ गुण, शौचालय वापर - ४ गुण, कचऱ्याचे व्यवस्थापन- १० गुण, सांडपाणी व्यवस्थापन- १० गुण)नागरिक तसेच मुख्य व्यक्तींची स्वच्छतेबाबतीत मते व अभिप्राय-३५ गुण (जाणीआव जागृती- २० गुण, नागरिकांचे आॅनलाईन अभिप्राय- ५ गुण, प्रभावी व्यक्तींचे अभिप्राय- १० गुण)स्वच्छता विषयक सद्यास्थिती- ३५ गुण (स्वच्छतेचे प्रमाण- ५ गुण, हागणदारी मुक्तीची टक्केवारी - ५ गुण, हागणदारी मुक्त पडताळणी - १० गुण, फोटो अपलोडींग - ५ गुण, नादुरुस्त शौचलय उपलब्धता - १० गुण, ) अशा तीन भागात गावांची तपासणी होणार आहे.