शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांपुढे परीक्षा शुल्काचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:27 IST

शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या नोकर महाभरतीत विविध विभागाच्या जागांसाठी पाचशे ते हजार रुपयांपर्यंत परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. आधीच बेरोजगार, मग एवढे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या बेरोजगार युवकांना पडला आहे. यामुळे संतापलेला युवावर्ग आता मानसिक तणावासोबतच आर्थिक तणावातही गुरफटला जात आहे. या प्रकारामुळे अनेक होतकरू व हुशार युवक अर्ज भरण्यास असमर्थ ठरत आहेत.

ठळक मुद्देपैसे आणायचे कुठून? : प्रत्येक परीक्षेसाठी हजारो रुपये शुल्क

परीमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या नोकर महाभरतीत विविध विभागाच्या जागांसाठी पाचशे ते हजार रुपयांपर्यंत परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. आधीच बेरोजगार, मग एवढे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या बेरोजगार युवकांना पडला आहे. यामुळे संतापलेला युवावर्ग आता मानसिक तणावासोबतच आर्थिक तणावातही गुरफटला जात आहे. या प्रकारामुळे अनेक होतकरू व हुशार युवक अर्ज भरण्यास असमर्थ ठरत आहेत.मागील काही वर्षांपूर्वी शासनाने नोकर भरती बंद केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. दरम्यान, शासनाने २०१९ ला मोठ्या प्रमाणात नोकभरती राबविण्याची घोषणा केली. त्यामुळे अनेक युवक स्पर्धा परीक्षेची तयारी जोमाने करु लागले. काही दिवसांपूर्वीच विविध पदांच्या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या. मात्र त्या पदभरतीसाठी पाचशे ते हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. बेकारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे युवक मिळेल ते काम करुन स्पर्धा परीक्षेची तयार करीत आहेत. मात्र पदभरतीमध्ये हजारो रुपये शुल्क आकारण्यात येत असल्यामुळे अनेकजण अर्ज भरणे टाळत आहेत. परिणामी अनेकांचे शासकीय नोकरीचे स्वप्न अंधातरीच राहण्याची चिन्हे दिसून येत आहेत.असे आहे परीक्षा शुल्कराज्य मार्ग परिवहन महामंडळातील ७६ जागांसाठी खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर मागसवर्गीयसाठी ५०० रुपये, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक हजार रुपये, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक एक हजार, भारतीय रेल्वे विभाग खुला व ओबीसी ५००, मागासवर्गीय २५०, राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर्स ७०० रुपये, युनियन बॅक आॅफ इंडिया ६०० रुपये, बँक आॅफ बळोदा ६००, कर्मचारी राज्य विमा महामंडळ पाचशे रुपये, तलाठी भरती खुला व इतर मागासवर्गीय ५००, मागासवर्गीय ३५०, शिक्षक भरती ५०० रुपये, भारतीय जिवन विकास महामंडळ ६०० रुपये अशा विविध ठिकाणी पाचशेच्या वर शुल्क आकारण्यात येत आहे. यासोबतच बँक शुल्क उमेदवाराला वेगळे द्यावे लागते.एका अर्जामागे दीड ते दोन हजार खर्चनुकत्याच राबविण्यात येत असलेल्या नोकर भरतीमध्ये पाचशे ते हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. सदर शुल्क भरण्यासाठी बँकेचे शुल्क वेगळे, अर्ज भरताना नेट कॅफेचे शुल्क, अर्ज प्रिंट करणे आदीसाठी पैसे मोजावे लागतात. त्यासोबत अनेक विभागाच्या परीक्षा या जिल्हा पातळीवर नसून विभागीयस्थळी असतात. त्यामुळे प्रवास खर्च वेगळा असा सरासरी एका अर्जाला दीड ते दोन हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे अर्ज भरताना युवकांना मोठी कसरत करावी लागते.भरती रद्द तर होणार नाही?विविध पदांच्या भरतीसाठी जागा निघाल्या आहेत. मात्र नुकताच लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यातच आदर्श आचारसंहितेची घोषणा झाली आहे. निवडणुकीचा निकाल मे महिन्यात जाहीर होणार आहे. त्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे नोकर भरती रद्द तर होणार नाही ना, अशी भीती बेरोजगार युवकांना सतावत आहे.