शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

शेतीलाच मानले सर्वस्व

By admin | Updated: October 21, 2015 01:17 IST

अपयश हाच माणसाचा पहिला गुरु असतो, असे म्हणतात. या अपयशातून कोणी काही बोध घेतला तर तो प्रगतीचा कितीही टप्पा गाठू शकतो, हे डोंगरगावच्या शंकर पाथोडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

शेती व्यवसायात नवा पायंडा : भाजीपाला पिकाने झाली आर्थिक उन्नतीघनश्याम नवघडे नागभीडअपयश हाच माणसाचा पहिला गुरु असतो, असे म्हणतात. या अपयशातून कोणी काही बोध घेतला तर तो प्रगतीचा कितीही टप्पा गाठू शकतो, हे डोंगरगावच्या शंकर पाथोडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती करुन पाथोडे यांनी परिसरात नवा पायंडा पाडला आहे.शंकर पाथोडे यांना वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. या शेतीला जोडव्यवसाय म्हणून ते टेलरींगचा व्यवसाय करायचे. पण एवढे करुनही आर्थिक अडचण ही पाचविला पुजलेली. अशातच त्यांना कोणीतरी रेशीम (तुर्ती) उद्योग करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानुसार त्यांनी तो व्यवसाय केला. पण अपयशच पदरी आले. आर्थिक दृष्टया अतिशय दयनीय अवस्था त्यांच्यावर आली. यातून मार्ग कसा काढायचा, या विवंचनेत ते असताना गावातीलच आनंदराव पाथोडे यांनी त्यांंना भाजीपाला लागवडीचा सल्ला दिला. हा सल्ला शिरसावंदय माणून त्यांनी वडिलोपार्जित शेतीत भाजीपाला पिकाची लागवड केली. वर्ष दोन वर्षात त्यांना बऱ्यापैकी पैसा दिसून लागला. शंकररावांचा उत्साह आणखीच वाढला. त्यांनी या व्यवसायात स्वत:ला पूर्ण वाहून घेतले. आता ते कोणतेही प्रशिक्षण न घेता अगदी आधुनिक पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करीत आहेत. या मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी आणखी पाच एकर शेती खरेदी केली आहे.पाथोडे आता सात एकरात वर्षभर भाजीपाला पिकाची तर तीन एकरात धानाची लावगड करीत आहे. त्यांनी संपुर्ण कुटुंबाला याच व्यवसायात वाहून घेतले आहे. सकाळी ६ वाजता त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतावर हजर होते आणि संध्याकाळी ७ वाजेपर्यंत शेतावर असतात. या व्यवसायात आपण कुठेही कमी पडू नये म्हणून पाथोडे यांनी शेतात आठ ठिकाणी बोअर तर दोन ठिकाणी विहिरी खोदल्या आहेत. या विहिर आणि बोअरच्या माध्यमातून ते वर्षभर कारले, चवळी, वांगी, टमाटर, भेंडी, कोबी, पानकोबी, मेथी, पालक, कोथिंबीर यांचे उत्पादन घेत असतात. या पिकातून वर्षाकाठी त्यांना १२ ते १३ लाखांचे उत्पन्न मिळत असून खर्च वजा जाता त्यांना आठ ते नऊ लाखांचा निव्वळ नफा उरत असतो. आज नागभीडमध्ये दररोज भाजीपाला येत असतो यातील निम्मा भाजीपाला डोंगरगाव येथीलच असतो. पुर्वी पाथोडे मोटार सायकलने भाजीपाल्याची वाहतूक करायचे गरज म्हणून त्यांनी आता टेंपो खरेदी केला असू त्याचा आणखी फायदा त्यांना होत आहे.